Headlines

प्रसिद्ध अभिनेते ‘रजनीकांत’ आहेत तब्बल एवढ्या संपत्तीचे मालक, वाचून थक्क व्हाल !

चित्रपट सृष्टीतील दिग्गज कलाकार अभिनेता रजनीकांतने चित्रपट सृष्टी एका वेगळ्या स्तरावर नेऊन ठेवली आहे. रजनीकांतच्या अभिनयाला लोक आज देखील खूप पसंत करतात. रजनीकांत त्यांच्या अनोख्या शैलीमुळे प्रसिद्ध आहे. रजनीकांत यांचे मूळ नाव शिवाजीराव गायकवाड असे आहे. १२ डिसेंबर १९५० मध्ये शिवाजीराव गायकवाड यांचा जन्म एका मराठी परिवारात झाला.
रजनीकांत यांनी १९७५ मध्ये त्यांच्या फिल्मी करिअरला सुरुवात केली होती. त्यांचा पहिलाच चित्रपट अपूर्वा रागंंगलने ३ राष्ट्रीय पुरस्कार जिंकले होते. या चित्रपटात रजनीकांत छोटीशी भूमिका होती. त्यानंतर रजनीकांत यांनी १९७६ मध्ये संगम या कन्नड चित्रपटात काम केले. १९७७ मध्ये तर रजनीकांतनी एकूण १५ चित्रपटांमध्ये काम केले.
यांतील अधिकतर चित्रपटांत त्यांनी नकारात्मक भूमिका साकारल्या होत्या. त्यानंतर १९७७ मध्ये आलेला तेलगू चित्रपट चीलकम्मा चेप्पिंडी मध्ये रजनीकांत यांना प्रमुख भूमिका साकारण्याची संधी मिळाली. त्यानंतर मात्र त्यांनी कधीच मागे वळून पाहिले नाही. ते कायम यशाच्या शिखरावर चढत राहिले. रजनीकांत यांनी १९८३ मध्ये अंधा कानुन या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते.

हे वाचा – लग्नाआधी अजय देवगन किंवा शाहरुख नव्हे तर हा अभिनेता होता काजोलचा क्रश !त्यानंतर त्यांनी हम, खून का कर्ज, फुल बने अंगारे यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटात काम केले. साऊथ इंडस्ट्री मध्ये तर त्यांनी एक वेगळीच उंची गाठली. जसा त्यांचा चित्रपट प्रदर्शित होतो तसे प्रेक्षक चित्रपटगृहात तोबा गर्दी करतात.
२०१० मध्ये रजनीकांतनी ऐश्वर्या राय सोबत रोबट चित्रपटात काम केले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान हिट झाला. त्यानंतर २०१८ आलेला रोबोट चा सिक्वेल २.० ने बॉक्स ऑफिसवर ७०० करोड रुपयांची कमाई केली. हा चित्रपट भारतातील अधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट ठरला.

हे वाचा – गर्लफ्रेंडला घेऊन कॉर्नर सीटला बसून चित्रपट बघणार असाल तर, हि बातमी नक्की वाचा !

रजनीकांत यांनी १५० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले. सध्या रजनीकांत कडे ५० मिलियन डॉलर संपत्ती आहे. रजनीकांत आता ६८ वर्षांचे असून ते प्रत्येक चित्रपटात काम करण्यासाठी ५५ करोड रुपये फी घेतात. रजनीकांत यांचे नेटवर्थ भारतीय इतर कलाकारांच्या तुलनेत खूप कमी आहे कारण ते जास्त जाहिरातींमध्ये काम करत नाहीत. शिवाय ते त्यांच्या संपूर्ण करीयर मध्ये कधीच कोणत्याच ब्रँड चे ब्रँड ॲम्बेसिडर राहिलेले नाही.

हे वाचा – शाळेच्या गणवेशात खूप सुंदर दिसत आहे ही अभिनेत्री, एकेकाळी एकाच मालिकेसाठी मिळाले होते १२ पुरस्कार !

अनेक राजकीय पक्षांना समर्थन दिल्या नंतर त्यांनी स्वतः ची रजनी मक्कल मंदराम ही संघटना स्थापन केली. नुकतेच त्यांनी २०२१ मध्ये होणाऱ्या तामिळनाडू विधान सभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केली आहे. रजनीकांत कडे ११० करोड रुपयांच्या आसपास बँक बॅलन्स आहे. शिवाय चेन्नई येथे त्यांचे अलिशान घर आहे.

हे वाचा – तुमच्या या आवडत्या अभिनेत्रीं बद्दल या गोष्टी तुम्हाला नक्कीच माहित नसतील !

सध्या या घराची किंमत २५ करोड रुपये आहे. चेन्नई सोबतच पुण्याला सुद्धा त्यांचे शानदार घर आहे. त्यांच्या पुण्यातील घराची किंमत तब्बल ४० करोड रुपये असल्याचे सांगितले जाते. त्यांच्याकडे एक मर्सिडीज वैगन (२.८ करोड रुपये) , एक रोल्स रॉयस घोस्ट (५ करोड रुपये), एक रोल्स रॉयास फैंटम (१६.५ करोड रुपये आणि एक कस्टम मेड लिमोसिन (२२.८ करोड ) या आलिशान गाड्या आहेत.

हे वाचा – शिल्पा शेट्टीने अक्षय कुमारबद्दल केलेला खुलासा वाचून तुम्हाला पण धक्का बसेल !

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *