अभिनेत्री करीना कपूर खान सध्या तिच्या कुटुंबासोबत लंडनला सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. बेबो तिच्या सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. सध्या ती तिच्या लंडनमधील दिनचर्येचा तसेच तेथील मजामस्तीचे फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांसाठी पोस्ट करते आहे.
मध्यंतरी सोशल मीडियावर करीना पुन्हा गरोदर असल्याच्या चर्चांना उधाण आले होते.काही फोटो व्हायरल झाल्यानंतर करीना तिसऱ्यांदा गरोदर असल्याच्या चर्चा रंगल्या. आता या अफवा थांबत नाही म्हटल्यावर करीनाने स्वत: तिच्या अनोख्या अंदाजात यासंदर्भातील स्पष्टीकरण दिले आहे. करीनाने ती गरोदर नसल्याचे मजेशीर पद्धतीत सांगितले.
इन्स्टा स्टोरीवर पोस्ट शेअर करत करीना कपूरने सांगितले की , मित्रांनो, ही पास्ता आणि वाइनची कमाल आहे. शांत रहा.. मी गरोदर नाही. देशाच्या लोकसंख्येमध्ये आपले मोठे योगदान असल्याचे सैफचे म्हणणे आहे. करीनाने पोस्ट शेअर करताच ती व्हायरल व्हायला वेळ लागला नाही. करीनाचा हा अनोखा अंदाज तिच्या चाहत्यांना खूप आवडतो.
सैफ अली खानला 4 मुले आहेत. त्याची पहिली पत्नी अमृता सिंहपासून सारा अली खान आणि इब्राहिम अली खान ही दोन मुले आहेत तर दुसरी पत्नी म्हणजेच करीना कपूर खानपासून तैमूर आणि जेह ही दोन मुले आहेत.
करीनाने गेल्या वर्षीच जेहला जन्म दिला होता. तो आता दिड वर्षांचा आहे. दोन दिवसांपूर्वी करिनाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता, ज्यामध्ये तिचा बेबी बंप असल्याचे वाटत होते. त्यानंतर ती तिसर्यांदा आई होणार असल्याची चर्चा रंगायला सुरुवात झाली. मात्र आता करीनाने स्पष्टीकरण देत सर्वांची बोलती बंद केली आहे.
सध्या करीना कपूर तिच्या व्यावसायिक आयुष्यावर लक्ष केंद्रित करत आहे. तिचा लाल सिंग चड्ढा हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !