एकेकाळचा प्रसिद्ध चित्रपट आशिकी मधील अभिनेता ‘राहुल रॉय’ खूप काळापासून चित्रपट सृष्टी पासून दूर होता मात्र आता ते पुन्हा एकदा चित्रपटसृष्टीत पुर्नपदार्पणासाठी सज्ज झाले आहे. या पुर्नपदार्पणासाठी ते मुंबईहून यूपी पर्यंत पायी चालत जाताना दिसतील. झालात ना चकित ! पण ते खरे खरे नव्हे तर द वॉक या चित्रपटात चालत जाणार आहेत. कोरोना व्हायरस च्या संक्रमणामुळे संपूर्ण देश लॉक डाऊन करण्यात आला. यादरम्यान अनेक मजुरांना स्वतःच्या राज्यात आणि घरी जाण्यासाठी कित्येक किलोमीटर पायपीट करावी लागली.
द वॉक हा चित्रपट याच परिस्थितीवर अवलंबून असेल. या चित्रपटात राहुल रॉय मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट त्यांच्या करिअरमध्ये एक नवे वळण घेऊन येऊ शकतो. द वॉक हा चित्रपट नितीन गुप्ता यांनी दिग्दर्शित केला आहे. नुकतेच राहुल रॉय यांनी या चित्रपटाचे एक पोस्टर रिलीज केले.
राहुल रॉय यांना त्यांच्या आईच्या शिफारसीमुळे पहिला चित्रपट मिळाला होता. त्यांची आई नव्वदच्या दशकातील एक उत्तम कॉलम लेखिका होत्या. चित्रपट दिग्दर्शक महेश भट एका कामानिमित्त राहुल रॉय यांच्या आईला भेटण्यासाठी गेले होते तेव्हा त्यांना राहुल रॉय यांचा एक फोटो दिसला. महेश भट तेव्हा तो फोटो बघून इम्प्रेस झाले. अधिक विचारपूस केल्यानंतर त्यांना समजले की राहुल यांनी दिल्लीमधून त्यांचे उच्चशिक्षण पूर्ण केले असून ते मॉडेलींग सुद्धा करतात. त्याच वेळी महेश भट यांनी राहुलला चित्रपटात घेण्याचे ठरवले.
त्यानंतर महेश भट यांनी राहुल रॉय यांना आशिकी या चित्रपटात घेतले आणि ते रातोरात स्टार झाले. त्याकाळी हा चित्रपट सहा महिने चित्रपटगृहात चालत होता. याच कारणामुळे राहुल रॉय हे एक ओळखीचे नाव झाले. राहुल रॉय यांचा पहिला चित्रपट भलेही सुपरहिट ठरला मात्र तरीही त्यानंतर सहा महिने त्यांना कोणताच नवा चित्रपट मिळाला नाही. त्यामुळे त्यावेळेस राहुल थोडे चिंताग्रस्त झाले.
परंतु नंतर अचानक एक दिवस त्यांनी एक साथ साठ चित्रपट साइन केले आणि चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त झाले. इतक्या साऱ्या चित्रपटांना एकत्र साईन केल्यामुळे त्यावेळी तीन-चार चित्रपटांचे शूटिंग त्यांना एक साथ करावे लागायचे. तर काही चित्रपटांसाठी ते वेळच काढू शकत नव्हते. त्यामुळे अर्ध्या चित्रपटांची सायनिंग अमाऊंट त्यांना परत करावी लागली होती.
२००६ मध्ये टीव्हीवर बिग बॉस हा रिॲलिटी शो सुरू झाला. या शोच्या पहिल्या सीझनमध्ये राहुल रॉय स्पर्धक म्हणून सहभागी झाले होते. आणि विशेष म्हणजे त्यांनी हा शो जिंकला सुद्धा होता.
याव्यतिरिक्त समीक्षक म्हणून त्यांनी कनू बहल यांचा तीतली व दिबाकर बॅनर्जी यांचा एल एस डी या चित्रपटाचे सहलेखक म्हणून सुद्धा काम केले. २०१८ मध्ये त्यांनी भाजपा या पक्षातून राजकारणात प्रवेश केला. नरेंद्र मोदी हे त्यांचे राजकारणात प्रवेश करण्यामागचे कारण असल्याचे त्यांनी सांगितले.
Bollywood Updates On Just One Click