साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्धअभिनेत्यांपैकी एक असलेल्या रामचरणचे चित्रपट अनेकदा सुपरहिट होतात. साऊथ इंडस्ट्रीत त्यांनी एकापेक्षा एक सरस चित्रपटांमध्ये काम केले आहे. राम चरण हे साऊथ इंडस्ट्रीतील एक मोठे सुपरस्टार आहेत . त्यांचे चाहते नेहमीच त्याच्या आगामी चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत असतात.
काही महिन्यांपूर्वीच त्याचा प्रदर्शित झालेल्या आरआरआर या चित्रपटाची बरीच चर्चा झाली होती. हा चित्रपट ब्लॉकबस्टरवर सुपर डुपर हिट ठरला होता, या चित्रपटात रामचरण व्यतिरिक्त ज्युनियर एनटीआर तसेच बॉलीवूड स्टार्स अजय देवगण आणि आलिया भट्ट यांनी भूमिका केल्या होत्या.
राम चरण हा प्रसिद्ध फिल्मस्टार चिरंजीवी यांचा मुलगा आहे. त्यानेही आपल्या वडिलांप्रमाणेच फिल्मी दुनियेत आपली कारकीर्द घडवून आपले मोठे नाव कमावले आहे. राम चरण त्याच्या प्रोफेशनल आयुष्यासोबतच वैयक्तिक आयुष्यासाठी देखील चर्चेत असतात.
रामचरणच्या लग्नाला 10 वर्षे झाली आहेत, पण आजपर्यंत एकही मूल त्यांच्या पदरात नाही. रामचरण बाबा कधी होणार, असा प्रश्न त्याचे चाहते नेहमी विचारताना दिसतात. याचे उत्तर रामचरणच्या पत्नीने नुकतेच एका मुलाखतीत दिले.
रामचरणने 2012 मध्ये त्याची बालपणीची मैत्रीण उपासनासोबत लग्न केले. लग्नापूर्वी हे दोघे कॉलेजमध्ये दोघांची खूप चांगली मैत्री होती. लग्नाच्या 10 वर्षानंतरही मूल होत नसल्याने रामचरणला अनेक प्रश्न विचारले जातात आणि त्याचे उत्तर त्याच्या पत्नीने दिले आहे. मुल न होण्यामागचं मोठं कारण सांगताना उपासना म्हणाली की, लोकसंख्या नियंत्रण लक्षात घेऊन मूल न होण्याचा विचार आम्ही केला आहे.
या प्रकरणाबाबत राम चरण म्हणाला की, जर मी मुलाला जन्म दिला तर मी माझ्या आयुष्यातील काही स्वप्नांपासून दूर जाऊ शकतो. माझी पत्नी उपासनाचीही काही ध्येये आहेत. त्यामुळे आम्ही काही वर्षे मूल न होण्याचा निर्णय घेतला आहे.
रामचरणच्या पुढील कामाबद्दल बोलायचे झाले तर, तो बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री कियारा अडवाणीसोबत आगामी चित्रपटांमध्ये दिसणार आहे. पण या चित्रपटाच्या निर्मात्यांनी अद्याप या चित्रपटाची घोषणा केलेली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, या चित्रपटाचे गाणे बिग बजेटमध्ये शूट केले जाणार आहे. रामचरणच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे झाले तर तो अलीशान जीवन जगतो.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !