बॉलीवूड चित्रपटांमध्ये बऱ्याचदा एकत्र कुटुंब पद्धती दाखवली जाते. यामध्ये परिवारातील सदस्य गुण्यागोविंदाने एकाच छताखाली नांदत असतात. चित्रपटातील परिवाराच्या सदस्यांमधील बॉण्डिंग बघून प्रेक्षकांना त्यांचा हेवा वाटतो. आपले सुद्धा कुटुंब असेच हसतेखेळते राहावे असे मनोमन त्यांना वाटते. कारण सर्वसामान्यांच्या घरात अनेकदा यावरून वाद होत असतात.
त्यामुळे या वादातून विरंगुळा म्हणून स्वतःचे मन दुसरीकडे केंद्रित करण्यासाठी चित्रपटांचा अवलंब घेतला जातो. अशावेळी चित्रपटांमधील परिवार पाहून आपला पण असाच परिवार असावा असे प्रत्येकाला वाटते. पण तुम्हाला माहित आहे का बॉलीवूड सेलिब्रिटींच्या परिवारामध्ये सुद्धा अनेक वाद विवाद आहेत. आज आम्ही तुम्हाला अशाच काही सेलिब्रिटींच्या घरांमधील वाद सांगणार आहोत.
कृष्णा – अभिषेक – अभिनेता कृष्णा हा एकेकाळचा सुपरस्टार गोविंदाचा भाचा आहे. या मामा भाच्यातील वाद जगापासून लपले नाहीत. काही दिवसांपूर्वीच जेव्हा गोविंदा द कपिल शर्मा शो मध्ये पाहुणा म्हणून गेला होता त्यावेळी कृष्णाने त्या एपिसोड मध्ये काम केले नव्हते. गोविंदा आणि कृष्णा यांच्यातील वादाचे कारण म्हणजे कृष्णाची पत्नी कश्मिरा शाह आहे.
तिने एकदा सोशल मीडियावर एक कमेंट केली होती ज्याचा संबंध गोविंदा सोबत लावल्यावर भरपूर हंगामा झाला होता. कश्मिरा ने एका कमेंट मध्ये म्हटले होते की पैशांसाठी नाचणारा स्टार. तिथेही कमेंट गोविंदा सोबत जोडली गेली होती कारण त्यावेळी गोविंदा एका लग्नात परफॉर्मन्स करून आले होते. २०१८ मध्ये झालेल्या या सोशल मीडिया पोस्ट वरील वादावरून या दोन परिवारा मधील दरी वाढत गेली ती आजतागायत कायम आहे.
जान – कुमार सानू – बिग बॉस सीझन १४ चा स्पर्धक जान कुमार सानू व त्याचे वडील कुमार सानू यांच्यातील संबंध फारसे ठीक नाहीत. या पिता-पुत्रांच्या जोडीत अनेकदा आरोप-प्रत्यारोपांचा सामना चालू असतो. जानच्या वडिलांनी तो लहान असतानाच त्यांचा परिवार सोडला होता त्यामुळे जानला त्याच्या आईने लहानाचे मोठे केले.
मुलगा व बायकोला सोडून कुमार सानू यांनी दुसरे लग्न केले. काही दिवसांपूर्वी बिग बॉसच्या एका एपिसोडमध्ये जान सानूने मराठी भाषेचा अ’प’मा’न केल्याबद्दल त्याला भरपूर ट्रोल करण्यात आले होते. त्यावेळी त्याच्या वडिलांनी त्याच्या जडणघडणी बद्दल प्रश्न विचारले. त्यामुळे जानच्या संतापाचा पारा भरपूर वाढला होता या घटनेनंतर या दोघांमधील वाद अजूनच चि’घ’ळ’त गेला.
अमिषा पटेल – २००४ मध्ये अभिनेत्री अमिशा पटेलने तिच्या परिवारावर तिच्या संपत्तीचा गैरवापर केल्याचा आरोप केला होता. झाले असे की, अमिषाने तिच्या स्वतःच्या वडिलां विरोधात १२ करोड रुपयांचा गं’डा घातल्याचा आरोप केला. त्यावेळी अमिषा दिग्दर्शक विक्रम भट्ट सोबत रिलेशन मध्ये होती.
अमिषाने मीडियाला दिलेल्या एका इंटरव्ह्यूमध्ये म्हटले, तिचे विक्रम सोबत असणे किंवा त्याच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय तिच्या आई-वडिलांना मान्य नाही. माझे लग्न एका पैसेवाल्या व्यक्तीसोबत व्हावे अशी त्यांची इच्छा आहे. मात्र जेव्हा मी त्यांना माझ्या पैशांबद्दल विचारले त्यावेळी त्यांनी माझ्यासोबत भांडण सुरू केले.
एवढेच नाही, एक दिवशी सकाळी चार वाजता त्यांनी मला विक्रम सोबत पाहिले त्यावेळेस माझ्या आईने मला च’प्प’ल ने मा’र’ले होते. त्यानंतर बरेचदा ती मला मा’रा’य’ची. रोज रोज च्या मा’र झोडीला वैतागून मी घर सोडले.
प्रतीक बब्बर – प्रतीक बब्बरचे त्याचे वडील राज बब्बर यांच्या सोबतचे संबंध फारसे ठीक नाहीत. एका इंटरव्ह्यूमध्ये त्याने सांगितले की त्याच्या वडिलांनी लहानपणी त्याची विचारपूस करण्याची सुद्धा तसदी घेतली नव्हती. ते नेहमीच त्यांच्या दुसऱ्या परिवारासोबत व्यस्त असायचे. त्यामुळेच प्रतीकने त्यांचे बब्बर हे आडनाव न लावण्याचा निर्णय घेतला. जेणेकरून त्याच्यात व त्याच्या वडिलांमध्ये काही आलबेल नसल्याचे जगाला कळेल.
मात्र काही दिवसांनी परिस्थिती सुधारली आणि त्यांच्यातील नाते देखील सुधारले. एकेकाळी प्रतिक ड्र’ग्स ए’डि’क्श’न मध्ये फसला होता त्यावेळेस त्याच्या वडिलांनी त्याला सांभाळून घेतले. तेव्हापासून यांच्या नात्यात सुधार येऊ लागला. २०१९ मध्ये प्रतीक ने सान्या सागर सोबत धु’म’ध’डा’क्या’त लग्न केले.
फैजल खान – अमीर खानचा भाऊ फैजल खान २००० मध्ये प्रदर्शित झालेल्या मेला या चित्रपटात दिसला होता. काही चित्रपटांमध्ये काम करून देखील इंडस्ट्रीमध्ये यश प्राप्त करता आले नाही. अकबर असे म्हटले जाते की यामुळे तो त्याचे मानसिक संतुलन गमावून बसला आणि एके दिवशी घर सोडून निघून गेला. त्यानंतर काही दिवसांनी फैजल घरी परत आला.
घरी परत आल्यावर मात्र त्यांने अमीर खान वर आरोप लावले. फैजल ने म्हटले होते की अमिरने त्याला घरात कै’दी बनवून ठेवले होते. त्याला मानसिक दृष्ट्या आजारी पाडून औषधे घेण्यास मजबूर केले. काय चालले आमीरवर त्याची संपत्ती ह’ड’प’ण्या’चा आरोप देखील केला.
फैजल द्वारे अमीर वर लावल्या गेलेल्या या आरोपांमुळे इंडस्ट्रीमध्ये गोंधळ निर्माण झाला होता. मात्र यावेळेस फैजल मानसिक दृष्टी आजारी होता. आता मात्र तो बरा झाला असून त्याचे व आमीरचे नाते देखील ठीक आहे.
कंगना राणावत – एक काळ असा होता ज्यावेळी कंगनाचे वडील अमरदीप राणावत आणि कंगणामध्ये विस्तव पेटत नव्हता. कंगनाचा मॉडेलिंग आणि अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णयाला तिच्या वडिलांचा कडाडून विरोध होता. त्यांच्या मुलीने डॉक्टर व्हावे अशी त्यांची इच्छा होती. कंगनाच्या मेडिकल शिक्षणासाठी त्यांनी तीच ऍडमिशन चंदीगड च्या डीएवी स्कूल मध्ये केले होते.
मात्र कंगनाचे अभ्यासात मन रमत नव्हते कारण तिला मॉडेलिंग मध्ये इंटरेस्ट होता. हळूहळू तिची मॉडेलिंग बद्दलची आवड इतके वाढत गेली की तिने शिक्षण घेणे सोडले. ती सुरुवातीला हॉस्टेलमध्ये राहायची मात्र शिक्षण सोडल्यानंतर ती पी.जी म्हणून राहू लागली. ज्यावेळी ही सर्व बाब कंगनाच्या वडिलांच्या लक्षात आली त्यावेळेस त्यांनी तिला खूप मारले.
कंगनाने घर सोडून चित्रपटात काम केल्यामुळे तिचे वडील कित्येक वर्षे तिच्या सोबत बोलत नव्हते. आता मात्र मुलीचे यश पाहून ते भरपूर खूश आहेत व त्यांच्यात खूप चांगले जमते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !