Headlines

रिलीजच्या आधीच शक्तिमानने बाहुबलीला मागे टाकले, मुकेश खन्ना यांच्यापुढे प्रभास आणि राजामौली फेल !

90 च्या दशकातील मुलांना मनोरंजनालसाठी फार सुंदर टीव्ही शो उपलब्ध होते. लहान मुलांना सुपर होरोंचे फार वेड असते. त्यामुळे मुलांच्या तोंडात स्पायदरमॅन सुपरमॅन, बॅटमॅन अशा सुपरहीरोंची नावे असतात. पण 90 च्या दशकातील लहान मुलांचा एकच सुपरहीरो होतो तो म्हणजे शक्तीमान. त्याकाळी या मालिकेने लहान मुलांना वेड लावले होते. प्रत्येक लहान मुलाला आपण अडचणीत सापडल्यावर आपल्याला सोडवायला शक्तीमान यावा असेच वाटायचे.

90 च्या दशकातील मुलांसाठी आता एक खूश खबर आहे. ते म्हणजे त्यांचा लाडका सुपरहीरो लवकरच त्यांना आता मोठ्या पडद्यावर पहायला मिळणार आहे. टीव्ही मालिका गाजवल्यावर शक्तिमान आता मोठा पडदा गाजवायला तयार आहे. पण शक्तीमान कोण साकारणार असा प्रश्न अनेकांना पडला आहे. काहींच्या मते ही भूमिका ह्रुतिक रोशन साकारणार आहे. तर काहींच्या मते अभिनेता अल्लू अर्जून किंवा रणवीर सिंह गंगाधरच्या भूमिकेत दिसू शकतात.

अजुनतरी निर्मात्यांकडून कोणत्याही प्रकारची घोषणा करण्यात आलेली नाही. पण या चित्रपटाच्या बजेटसंबधी मोठी बातमी समोर आली ती म्हणजे या चित्रपटाच्या बजेटने बाहुबली 2 चित्रपटालासुद्धा मागे टाकले आहे. बाहुबली 2 चित्रपटाचे बजेट 250 करोड रुपये होते तर शक्तिमानचे बजेट 300 करोडच्या आसपास असणार असल्याचे म्हटले जाते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !