अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर रिया चक्रवर्ती आता तिचे करिअर आणि तिचे जीवन पुन्हा एकदा पटरीवर आणण्याचा प्रयत्न करत आहे. हल्ली रिया चक्रवर्ती फार कमी इव्हेंटमध्ये आपल्याला दिसते. सुशांतसिंग राजपूत बाबतची घटना घडल्यानंतर रियाने सोशल इव्हेंटमध्ये येणे कमी केले. त्यामुळे अशा मोठमोठ्या इव्हेंट मध्ये रियाला फार क्वचितच पाहिले जाते. रिया सोशल मीडियावर तीचे फोटो आणि व्हिडिओ अपलोड करून तिचा फॅन सोबत जोडले राहण्यासाठी प्रयत्न करते.
हल्ली रियाने तिचे नवीन फोटो इंस्टाग्रामवर अपलोड केले आहेत. ज्यामध्ये ती खूपच हॉट दिसत आहे. रियाने फक्त स्वेटशर्ट घालून हे फोटोशूट केले आहे. या फोटोना तिने खाली कॅप्शन दिले आहे स्वतःसाठीचा उजेड स्वतः शोधा आणि ऊब मिळवा. यामध्ये रियाने मेसी बन बांधला आहे.
सूर्याच्या प्रकाशात बसून रिया चक्रवर्तीने हे फोटोशूट केले आहे. उन्हाच्या तिरप रियाच्या चेहऱ्यावर पडल्यामुळे ती आणखीनच सुंदर दिसत आहे. एकंदरीत रीयाचा आऊटफिट तिची हेअर स्टाईल उन्हाची येणारी पिरीप या सगळ्या गोष्टी तिच्या फोटोना पूरक ठरल्या आहेत.
मागची दोन वर्ष रिया खूप वेगळ्या मनस्थितीतून जात होती. ही वर्ष तिच्यासाठी फार वाईट होती. ती सतत तिच्या आयुष्यातील वैयक्तिक कारणांमुळे चर्चेमध्ये होती. दोन वर्षान आधी जेव्हा सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली होती तेव्हा रिया चक्रवर्तीवर फार गंभीर आरोप लावण्यात आले होते.
सुशांत ची गर्लफ्रेंड असणाऱ्या रियाला आता तिचे नवीन प्रेम मिळाले आहे. ती तिच्या आयुष्यात आता पुढे जाण्याचा प्रयत्न करत आहे. रिया चक्रवर्ती सध्या बंटी सजदेह याला डेट करत आहे अशी बातमी मिळाली आहे, पण ही बातमी खरी आहे की खोटी हे अजून स्पष्ट झाले नाही.
रियाने एमटीव्हीवर आज विजय म्हणून तिच्या करिअरची सुरुवात केली होती. रियाने तिचे शिक्षण आर्मी स्कूल ऑफ अंबाला मधून पूर्ण केले आहे. २००९ मध्ये रियाने छोट्या पडद्यापासून तिच्या करिअरची सुरुवात केली. २०१९ साली तिने सुशांत सिंह राजपूतला डेट करायला सुरुवात केली. रिया चक्रवर्ती मूळची बंगाली आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर तिच्या आयुष्यात अनेक उतार चढाव आले. अनेक समस्यांना तिला सामोरे जावे लागले. आता कुठे ती पुन्हा मूळ प्रवाहात येण्याचा आणि काम करण्याचा प्रयत्न करत आहे.
हाफ गर्लफ्रेंड, चेहरे, जलेबी, दोबारा, बँक चोर, मेरे डॅड की मारुती यासारख्या हिंदी चित्रपटांमध्ये रिया चक्रवर्तीने काम केले आहे. यासोबतच टेलिव्हिजन मधील अनेक शोमध्ये देखील रियाने काम केले आहे. त्यानंतर सुशांत सिंग राजपूत बाबतचे प्रकरण झाल्यानंतर ती त्यामध्ये संपूर्णपणे अडकले गेली.
आता कुठे तिच्या करिअरला सुरुवात होत होती पण सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूमुळे आणि रिया चक्रवर्ती ही त्या केसचा महत्त्वाचा भाग असल्यामुळे ती त्यात गुंतली होती. पण आता सध्या रियाच्या व्हायरल होत असलेल्या फोटोंमुळे ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !
Bollywood Updates On Just One Click