सेलिब्रेटी अनेकदा त्यांच्या बालपणीचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. काहींचे बालपणीचे फोटो इतके वेगळे असतात की त्यांना पटकन ओळखताच येत नाही. आता खालील फोटोचेच पहा ना. फोटोत एक लहानगा त्याच्या बहिणीसोबत आरामात झोपून पोज देत आहे. पण तोच लहानगा बॉलिवूडचा सध्याचा टॉपचा अभिनेता आहे.
जो सतत कोणत्याना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतो. तसेच त्याची पत्नीही बॉलिवूडमधील टॉपची अभिनेत्री आहे. तसेच काही दिवसांपूर्वीच तो त्याच्या अनोख्या फोटोशूटमुळे सुद्धा चर्चेत होता. आता एवढ्या हिंट दिल्यावर तुम्हाला तो अभिनेता कोण हे नक्कीच समजलं असेल…
View this post on Instagram
नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो. फोटोत दिसणारा तो गोड मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून अभिनेता रणवीर सिंह आहे. रणवीरचा जन्म मुंबईत झाला. त्याला लहानपणापासूनच अभिनेता व्हायचे होते. पण कॉलेजमध्ये गेल्यावर त्याचे ते वेड थोडे बाजूला ठेवून त्याने कॉपी रायटर म्हणून काम करण्यास सुरुवात केली. इंडियाना युनिवर्सिटी, ब्लूमिंगटन मधून बॅचलर ऑफ आर्ट्स ही डिग्री घेतल्यावर तो भारतात परतला आणि ऑडिशन देण्यास सुरुवात केली.
2010 मध्ये तो एका ऑडिशनमध्ये सिलेक्ट झाला आणि त्याला त्याचा पहिला वहिला चित्रपट बॅण्ड बाजा बारात मिळाला. त्यात त्याने दिल्लीत राहणाऱ्या बिट्टू या पात्राची भूमिका साकारली होती. त्यावर्षी फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा पुरस्कार रणवीरला मिळाला होता.
आता अलिकडेच 2022 मध्ये त्याला दादसाहेब फाळके पुरस्काराने गौरवण्यात आले. रणवीरने काही दिवसांपूर्वी केलेल न्यू*ड फोटोशूट सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले होते. काही ठिकाणी त्याचा निषेध म्हणून पोलिसांत तक्रारही केल्या. पण बॉलिवूड कलाकारांनी मात्र त्याच्या शूटला पाठिंबा दर्शवला.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !