Headlines

उर्फी जावेदची ही फॅशन पाहून वेडे झाले लोक, म्हणाले आईस्क्रीमच्या कोनची किंमत … !

उर्फी जावेद ही तिच्या अतरंगी स्टाईलसाठी ओळखली जाते. उर्फी जावेद हिला अनेकदा तिच्या कपड्यांवरून ट्रोल केले जाते. अनेकदा तर अतरंगी कपड्यांमुळे उर्फीला जीवे मारण्याची धमकी देखील मिळाली आहे. असे असले तरीही उर्फीचं शेपूट वाकडं ते वाकडं. उलट उर्फीला तिच्या कपड्यांवरून टार्गेट करणाऱ्यांना ती सडेतोड उत्तर देते.

आताही उर्फी तिच्या ढिंनच्याक कपड्यांमुळेच चर्चेत आलीये. यावेळी तर उर्फीचे कपडे पाहून अनेकजण हैराण झाले आहेत. उर्फीच्या या नव्या आणि हटक्या स्टाईलचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये उर्फी जावेद हिने काळ्या रंगाचा स्कर्ट घातला आहे. तिने आईस्क्रीम कोनचे ब्रालेट तयार केले असल्याने तिला ट्रोल केले जात आहे.

मखमली स्कर्ट आणि आइस्क्रीम कोनपासून तयार केलेले ब्रालेट अशा अवतारात उर्फी सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. तिच्या या विचित्र अवतारमुळे अनेकांच्या नजरा तिच्यावर खिळल्या आहेत. पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करून उर्फी बिनधास्त कॅमेऱ्यासमोर पोज देत आहे. तर उर्फी जावेदची ही स्टाईल अनेकांच्या पचनी पडली नाहीये. सोशल मीडियावर कमेंट करत लोक तिला ट्रोल करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)


अनेकांनी म्हटले की, स्टाईलसाठी आणि प्रसिध्दीमध्ये राहण्यासाठी ही उर्फी कधी काय करेल हे सांगणे अवघड आहे. एका युजर्सने उर्फीच्या व्हिडीओवर कमेंट करत म्हटले की, मला उर्फीचा हा लूक पाहून चक्करच येत आहे. दुसऱ्याने लिहिले की, लोक उर्फी जावेद हिच्या स्टाईलवर जळतात. तर काही लोक म्हणाली आता आईस्क्रीमच्या कोणची किंमत नक्की वाढेल.

उर्फी जावेद हिच्या कपड्यांवरून चित्रा वाघ यांनी उर्फीला टार्गेट केले होते. इतकेच नाहीतर चित्रा वाघ यांनी थेट उर्फी जावेद हिला जिथे भेटेल तिथे चोपून काढण्याची भाषा केली होती. मात्र, उर्फी जावेद हिने देखील चित्रा वाघ यांना सडेतोड उत्तर दिले होते.

उर्फी जावेद हिला काही दिवसांपूर्वी एका ब्रोकरने ब’ला’त्का’र करून जीवे मारण्याची धमकी दिली होती. त्यानंतर उर्फीच्या तक्रारीनंतर याला पोलिसांनी बिहारमधून अटकही केली.

उर्फी जावेद ही मुळ उत्तर प्रदेशची असून गेल्या काही वर्षांपासून ती मुंबईमध्येच राहते. परंतु तिच्या अतरंगी स्टाइलमुळे मुंबईत तिला भाड्याने घर मिळणे अवघड जात असल्याचे कळते. पण काहीही असो, उर्फी जावेद हिचा चाहता वर्गही मोठा आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !