आपल्या संवाद कौशल्याच्या जोरावर ज्यांनी चित्रपटामध्ये अभिनय करत हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचे नाव गाजवले ते म्हणजे अभिनेते राज कुमार. पेशाने पोलीस असलेले राजकुमार यांनी चित्रपटसृष्टीत तब्बल ५ वर्षांच्या अथक प्रयत्नांनंतर मदर इंडिया या चित्रपटातील छोटयाश्या भूमिकेतून राज कुमार हे केवळ हिंदी चित्रपटसृष्टीत नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध झाले. मदर इंडिया चित्रपटाच्या यशानंतर अनेक चित्रपटांतून एक उत्तम अभिनेता म्हणून त्यांचा प्रवास अव्याहातपणे सुरु राहिला.
त्यांचा वक्त या चित्रपटातील ‘चिनायसेठ जिनके घर शीशेके बने होते है, वो दुसरों पे पत्थर नही फेका करते’ तसेच ‘चिनायसेठ ये छुपी बच्चों के खेलने की चीज नही. हाथ कट जाये तो खून निकल आता है’ हे संवाद लोकप्रिय होण्यासोबत त्यांना डॉयलॉगकिंग ही पदवी प्रेक्षकांनी बहाल केली. तिरंगा, पुलिस और मुजरिम, इंसानियात के देवता, बेताज बादशाह, जवाब हे ९० च्या दशकातील त्यांचे प्रसिद्ध चित्रपट होते. राजकुमार यांचे वयाच्या ६९ व्या वर्षी घशाच्या क*र्क*रो*गा*मुळे निधन झाले. त्यांनी त्यांच्या अभिनय कारकिर्दीत ७० पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले आहे.
राजकुमार हे आपल्या दर्जेदार अभिनयासोबतच स्वभावामुळे देखील परिचित होते. अगदी कडक शिस्तीचे आणि फटकळ स्वभावाचे होते. समोरच्याला लागत उत्तर देण्याच्या स्वभावामुळे राज कुमार यांच्याशी संबंधित अनेक किस्से चर्चेत आहेत. असाच एक किस्सा ३१ वर्षांआधी सलमान खानसोबत देखील घडला होता. १९८९ मध्ये सलमान खानचा सुपरहिट ठरलेला पहिला चित्रपट मैने प्यार किया. या चित्रतपटाची पार्टी ठेवण्यात आली होती.
त्या चित्रपटाचे दिग्दर्शक सुरज बडजात्या यांनी राज कुमार यांना देखील आमंत्रित केले होते. राज कुमार यांनी बडजात्या यांना सांगितले होते कि, मला या चित्रपटाच्या सर्व कलाकारांना भेटायचे आहे. त्याचवेळी बडजात्या हे राज कुमार यांना सलमान खानला भेटवण्यास घेऊन गेले. जेव्हा राज कुमार अचानक सलमान खानला भेटले तेव्हा सलमान खान ने राज कुमार यांना विचारले आपण कोण?
सलमानचे उद्गार ऐकताच राज कुमार यांचा रंगाचा पारा एकदम चढला आणि सलमानला ते उत्तर देत म्हणाले, बेटा, तुझ्या बाबांना जाऊन विचारून ये मी कोण आहे ते? सलमानला कळताच त्याने त्यांची माफी मागितली. आणि मग या घटनेनंतर जेव्हा केव्हा सलमान राज कुमार यांना कुठे दिसत असत व भेटत असत तेव्हा ते जाऊन राजकुमार यांची पहिली भेट घेत.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !