आपल्याकडे बुवा बाबा म्हटलं तर ते अत्यंत साध्वी धार्मिक तरी असतात नाहीतर दुसरे म्हणजे त्याच्या अगदी विरुद्ध टोक ढोंगी असतात. अनेकजण आपल्या समस्या घेऊन त्यांचे निवारण करण्यासाठी साधू-बाबांकडे जात येत असतात. त्यातील काही साधू हे सेलिब्रेटी बाबा देखील बनले आहेत. त्यातीलच एक म्हणजे धीरेंद्र शास्त्री.
ते पुन्हा एकदा वेगवेगळ्या प्रश्नांच्या जाळ्यात सापडले आहेत. अनेकजण त्यांना त्यांच्या लग्नावरुन प्रश्न विचारत आहेत. यावर त्यांनी त्यांचे वक्तव्यही मांडले आहे. जे आम्ही तुम्हाला या लेखातून सांगणार आहोत.”
का करणार लग्न – शास्त्रींना जेव्हा त्यांच्या लग्नाबद्दल विचारले गेले तेव्हा त्यांनी या प्रश्नाचे कारणासकट उत्तर दिले. ते म्हणाले की, त्यांना टार्गेट केले जात आहे. मी एक साधू आहे. आणि मला साधू असल्यामुळेच टार्गेट केले जात आहे. एका साधूला दोन प्रकारे टार्गेट केले जाते. त्यातील पहिला प्रकार म्हणजे पैसे आणि दुसरे म्हणजे स्त्री. त्यामुळे माझ्यावर अजून निशाणा साधला जाण्यापूर्वी मी लग्न करणार आहे. जे मला सतत टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांचे प्रयत्न मी लवकरच अयशस्वी करुन दाखवणार आहे.
लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज – एका मुलाखतीत त्यांना विचारले गेले होते की, तुमचे नाव जया किशोरी यांच्याशी जोडले जाते. तुमचे त्यांच्याशी लग्न होणार आहे का.. त्यांचे नाव कोणाशीही जोडू नका. त्यांनी कोणाशी लग्न करावे हे त्यांचे गुरु, आई-वडिल ठरवतील.
काय आहे वादाचा मुद्दा – नागपूरात एका कथनाच्या कार्यक्रमात श्याम मानव यांनी धीरेंद्र शास्त्रीवर ते समाजात अंधविश्वास पसरवत असल्याचा आरोप लावला. त्यानंतर धीरेंद्र यांनी सर्वांना आव्हान देत म्हटले की, जर कोणी माझ्यासारखा च’म’त्का’र करुन दाखवेल त्याला मी तीस लाखांचे बक्षीस देईन. आणि जे माझ्याकडे या च’म’त्का’रां’चा पुरावा मागतील त्यांना मी उघडे पाडीन.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !