Headlines

रॉयल इन्फिल्ड बुलेटला भविष्यात टक्कर देईल नवीन यामाहा आरएक्स हंड्रेड, कंपनीने केली मोठी घोषणा !

युवा वर्ग आणि बाईक यांचे आगळे वेगळे समीकरण आहे. प्रत्येक वयामध्ये आलेला मुलगा बाईक विकत घेत असतो, अशावेळी चांगल्या चांगल्या बाईक घेणे तसेच ट्रेण्ड असलेल्या बाईक घेणे यासाठी युवा वर्ग मोठ्या प्रमाणावर पसंती देत असतात. अनेकदा तर दहावी बारावी पास झाल्यावर आई वडील आपल्या मुलांना बाईक विकत घेऊन देत असतात, अशावेळी जर तुम्ही देखील भविष्यात बाईक विकत घेणार असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आम्ही घेऊन आलेलो आहोत.

ही बातमी तुम्हाला बाईक विकत घेण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. 90 च्या दशकामध्ये युवा वर्गाच्या हृदयाची धडधड आणि आपल्या काळातील आयकॉनिक बाईक यमाहा आर एक्स हंड्रेड तुम्हा सर्वांना माहिती असेल. ही आर एक्स हंड्रेड बाईक आता पुन्हा नव्याने बाजारामध्ये धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज होत आहे. यमाहा हा असा एक ब्रँड आहे, जो तरुण वर्गाचा महत्त्वाचा ब्रँड मानला जातो. आतापर्यंत ग्राहकाच्या भावनांशी जोडला गेलेला एक ब्रँड म्हणून देखील याची ओळख मार्केटमध्ये निर्माण झालेली आहे, म्हणूनच बाईक लवर आणि यमाहा यांचे आगळे वेगळे नाते आहे.

यमाहा आर एक्स हंड्रेड कमिशन नॉर्म मुळे काही काळ बंद होते परंतु आता पुन्हा नोर्म बदलल्याने बिना बी एस सिक्स इंजिन सोबतच या बाईकने बाजारामध्ये नवीन एन्ट्री केलेली आहे. आज ही भारतीय बाजारांमध्ये सेकंड हॅन्ड यमाहा आर एक्स हंड्रेड ची खरेदी विक्री केली जात आहे. ही बाईक रस्त्यावर अगदी सुसज्ज पद्धतीने धावते आणि तिची कार्यक्षमता तितकीच उत्तम आहे आणि म्हणूनच आज ही ग्राहक वर्ग या बाईकला मोठ्या प्रमाणावर पसंती देत असतो.

वेगवेगळ्या माध्यमांच्या अहवालानुसार जाणून घ्यायचे झाल्यास तर यमाहा आर एक्स हंड्रेड भविष्यात मोठ्या इंजिनची लाँच करण्याची योजना आखत आहे, तसेच भविष्यात रॉयल इन्फिल्ड ला टक्कर देण्याचे देखील ठरवत आहे. यमाहाकडून विश्वासाने ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर मागणी होत आहे, त्याचबरोबर ग्राहक मोठ्या आतुरतेने आर एक्स हंड्रेड लॉन्च होण्याची वाट देखील पाहत आहे.

वरील सर्व माहिती खुद्द यमाहाचे प्रेसिडेंट म्हणजेच प्रमुख यांनी ही माहिती जाहीर केलेली आहे. या माहितीनुसार यमाहा आर एक्स हंड्रेडला 125cc ते 250cc इंजिन क्षमता असलेली बाईक मार्केटमध्ये लॉन्च केली जाऊ शकते, ही माहिती प्रेसिडेंट ईशिन चीनच्याना यांनी दिली आहे. तसेच आर एक्स हंड्रेड हे नाव न वगळता देखील ही गाडी मार्केटमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण करेल असे देखील त्यांचे म्हणणे आहे म्हणूनच ब्रँडची प्रेसिडेंट लवकरच मार्केटमध्ये नव्याने अधिक क्षमता असलेली बाईक लॉन्च करणार आहे, यात कोणत्याही प्रकारची शंका नाही