कोरोनाव्हायरस च्या संक्रमणामुळे संपूर्ण देश टाळेबंद करण्यात आला. त्यामुळे अनेक नागरिक वेगवेगळ्या राज्यात त्यांच्या घरच्यांपासून दूर अडकले आहेत. कित्येक जणांना त्यांच्या घराकड ची वाट खुणावत असल्याने नागरिक त्यांच्या घरच्यांच्या आठवणीने व्याकुळ झाले आहेत. काही नागरिकांनी तर पैशांअभावी चक्क किती किलोमीटर पायी चालत जाण्याचा निर्णय घेतला. अशातच या नागरिकांसाठी सोनू सूद एका देवदूताला प्रमाणे धावत आला आहे. ज्याप्रकारे तो देशभरात विविध ठिकाणी अडकलेल्या नागरिकांची मदत करत आहे त्यावरून त्याचे कौतुक करू तितके कमीच असे म्हणावे लागेल.
जिथे बॉलीवूड कलाकार त्यांच्या ऐशोआरामाच्या आयुष्यासाठी ओळखले जातात तिथेच सोनू सूद रस्त्यावर उतरून कामगारांसाठी गाड्यांची व्यवस्था करताना दिसत आहे. त्याने त्याचा एक हेल्पलाइन नंबर (Helpline number – 18001213711 ) सुद्धा तयार केला आहे. या नंबरवर त्याला सतत गरजू व्यक्तींचे फोन आणि मेसेजेस येत असतात. आज देखील हजारो-लाखो संख्येमध्ये लोक आहेत जे त्यांच्या घरी जाण्याची वाट पाहत आहेत. या लोकांच्या मदतीसाठी सोनू सूद दिवस-रात्र एक करून काम करत आहे. याच दरम्यान एका मुलाखतीमध्ये सोनूने त्याच्या दिनचर्ये बद्दल सांगितले.
सोनू सोबतच त्याचा परिवार सुद्धा या कामाला हातभार लावत आहे. दिवसभराच्या दिनचर्ये बद्दल बोलताना सोनूने सांगितले की तो गेले तीन-चार दिवस झोपलाच नाही. काही दिवसांपूर्वीच कोच्चिवाली फ्लाईट सोबत त्याला कॉर्डीनेशन करावे लागले. काल सुद्धा अनेक लोक होते आणि आज सुद्धा भरपूर लोक आहेत ज्यांना निघायचे आहे. अशा लोकांना संपर्क करून सांगावे लागते. यातच खूप सारा वेळ निघून जातो. प्रत्येकाच्या मेसेजला उत्तर द्यावे लागते. ज्यांना उत्तर दिले आहे अशांचा सारखा फॉलोअप घ्यावा लागतो. त्यामुळे वेळ मिळतच नाही.
हे वाचा – या अभिनेत्याने देशासाठी केले प्रचंड दान, पण तरीही ऐकावे लागत आहेत या लोकांचे टोमणे !
मी माझ्या मुलांसोबत जेवणाच्या टेबलवर बसून जेवत होतो त्यावेळी सुद्धा फोनवरच बोलत होतो. त्यावेळी माझ्या लहान मुलगा मला बोलला की पप्पा पूर्वी तुम्ही माझ्यासोबत खूप वेळ घालवायचात पण हल्ली मात्र तुम्ही मला वेळच देत नाही. तुम्ही खूपच बिझी झाला आहात. त्यावेळी सोनुने त्याच्या मुलांना उत्तर दिले कि मी आता तुमच्या सोबत वेळ घालवत नाही मात्र माझ्या या वेळ न घालवण्यामुळे बाहेर असे अनेक परिवार आहेत जे एकमेकांना भेटून त्यांच्या सोबत वेळ घालवू शकतात. माझी मुलं समजूतदार आहेत ते सुद्धा मला या कामात मदत करतात. ते लिस्ट बनवून कोण कुठे अडकले आहे हे पाहतात.
हे वाचा – विक्की कौशलने जेव्हा सलमान खानच्या समोरच कॅटरिनाला घातली लग्नाची मागणी !
सोनुने पुढे सांगितले की त्याच्या वडिलांचे पंजाब मध्ये दुकान होते. तर त्याची आई लोकांना मोफत शिक्षण द्यायची. माझ्या आईवडिलांनी मला नेहमीच शिकवले आहे की तुमची सफलता तेथेच कामी येते जेव्हा तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीचा हात धरून त्याला मदत करता. नाहीतर तुमची सफलता काहीच कामाची नाही.