१९ वर्षाच्या मुलाला सोडून स्वतःच्या प्रियकरासोबत लॉकडाऊन मध्ये वेळ घालवत आहे ही अभिनेत्री !

1405

कोरोनाव्हायरस च्या संक्रमणामुळे संपूर्ण देश लॉक डाऊन केला गेला आहे. त्यामुळे सध्या सर्वसामान्य जनते सोबतच बॉलीवूड कलाकार सुद्धा घरातच टाळेबंद झाले आहेत.‌ कोरोनाव्हायरस सोबत लढण्यासाठी सध्या अनेक सेलिब्रिटी एकत्र येऊन काम करत आहेत. या महामारी च्या काळात सरकारला साथ देत आहेत‌. अशातच आज आम्ही तुम्हाला एका अशा अभिनेत्री बद्दल सांगणार आहोत जी या लॉक डाऊन मध्ये स्वतःच्या १९ वर्षाच्या मुलाला सोडून तिच्या प्रियकरासोबत राहत आहे.
आम्ही ज्या अभिनेत्री बद्दल बोलत आहोत ती दुसरी तिसरी कोणी नसून मलाइका अरोडा आहे. सध्या ती या लॉक डाऊनच्या काळात अर्जुन कपूर सोबत वेळ घालवत आहे. या दोघांचे अफेअर मागील काही काळापासून खूप चर्चेत आले आहे. मलाईका आणि अर्जुन बरेचदा पार्ट्यांमध्ये एकत्र दिसतात. मात्र आता या दोघांचे नाते इतके पुढे गेले आहे की दोघेही एकाच घरात राहून वेळ घालवत आहेत.
एप्रिलच्या ५ तारीख ला पंतप्रधान मोदींनी संध्याकाळी पाच वाजता सर्वांनी एकत्र येऊन जे लोक अत्यावश्यक सेवेसाठी कार्यरत आहेत अशांना अभिवादन करण्यासाठी आणि त्यांचे कौतुक आणि आभार मानण्यासाठी टाळ्या वाजवण्यास सांगितले होते. त्यावेळी अर्जुन आणि मलाईकाने सुद्धा टाळ्या वाजून आभार प्रदर्शन केले. मलाइका ही एका 19 वर्षीय मुलाची आई आहे. तसेच तिचा घटस्फोट सुद्धा झालेला आहे. तिने सुप्रसिद्ध अभिनेता सलमान खानच्या भावासोबत म्हणजेच अरबाज खान सोबत लग्न केले होते. सध्या या दिवसात मलाइका तिच्या मुलाला सोडून बॉयफ्रेंड असलेल्या अर्जुन कपूर सोबत त्याच्या घरी राहत आहे.
मध्यंतरी मलाईका आणि अर्जुन कपूर चा एक फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता. जनता कर्फ्यू दरम्यान दोघांनी एकत्र राहणे त्यांच्या फॅन्सना धक्का लावून गेले. या जनता कर्फ्यू च्या काळात अर्जुन आणि मलाइका एकमेकां शिवाय राहू शकत नाहीत हे दिसून येते. दोघांनी अर्जुनच्या बाल्कनीत येऊन एकत्र टाळ्या वाजवल्या होत्या. त्या फोटोमध्ये हे स्पष्ट दिसत होते.
अर्जुन कपूर आणि मलाइका अरोडा बऱ्याच ठिकाणी एकत्र दिसतात. नुकतेच दोघांना मुंबईत एकमेकांचा हात पकडून बघितले गेले. दोघेही बरेचदा एकत्र दिसून येतात हे त्यांच्या फॅन्सना सुद्धा खूप आवडते. आता या दोघांचे फॅन्स त्यांच्या लग्नाची आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र या दोघांनी अधिकृतरित्या त्यांच्या नात्याची कबुली दिलेली नाही.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !