ही गोष्ट १९५७ ची आहे जेव्हा १४ वर्षांचे वीरू देवगण बॉलीवूड मध्ये आपले नशीब आजमावण्यासाठी अमृतसर मधील त्यांच्या घरातून पळून आले होते. मुंबईत येण्यासाठी त्यांनी अमृतसर वरून तिकीट न काढताच फ्रंटियर मेल पकडली होती. मुंबईला आल्यावर तिकीट न काढल्यामुळे टीसीने पकडल्यावर त्यांना आठवडाभरासाठी जेलमध्ये रहावे लागले होते.
घरातून बाहेर पडून ते मुंबईला आले तर होते परंतु येथे येऊन त्यांची भुकेने उपासमारी होऊ लागली होती. त्यांच्यासोबत आलेल्या त्यांच्या काही मित्रांनी ही उपासमारी सहन न झाल्याने अमृतसरला परत जाण्याचा निर्णय घेतला. मात्र वीरू मुंबईतच राहिले. मुंबईत राहून सुरुवातीच्या दिवसांत त्यांनी टॅक्सी साफ करण्याचे काम केले, त्यानंतर कारपेंटर म्हणूनसुद्धा काम करू लागले. थोडीफार हिम्मत जमा झाल्यावर फिल्म स्टुडिओज मध्ये चक्कर मारू लागणे. त्याला एक अभिनेता बनायचे होते. मात्र लवकरच त्यांना समजले की चित्रपटांमध्ये चॉकलेट बॉय म्हणून चेहरे दिसत आहेत त्यांच्यासमोर आपला काही टिकाव लागणार नाही. वीरू यांनी स्वतः सांगितले होते की, जेव्हा मी आरशात स्वतःला पहायचो त्यावेळेस इतर स्ट्रगलर्स च्या तुलनेत स्वतःला खूप कमी लेखायचो. त्यामुळेच नाही अभिनेता बनण्याच्या स्वप्नात हार मानली. पण मी तेव्हा हा शपथ घेतली की माझा पहिला मुलगा हा नक्की हिरो बनेल.
वीरू यांनी त्यांचा मुलगा अजयला हिरो बनवण्यासाठी त्याच्यावर खूप मेहनत घेतली. अजयला त्याच्या कमी वयातच फिल्ममेकिंग ॲक्शन यांसारख्या गोष्टी शिकवण्यास सुरुवात केली. तेव्हापासून ते अजयच्या हातून चित्रपटांशी निगडित गोष्टी करून घ्यायचे. अजय जेव्हा कॉलेजला जाऊ लागला त्यावेळी त्याला डान्स क्लासमध्ये घातले. घरातच त्याच्यासाठी जिम तयार केली. सोबतच त्याला उर्दू चा क्लास देखील लावला. हॉर्स रायडिंग यांसारख्या गोष्टी शिकवल्या.
त्यानंतर त्यांनी त्यांच्या चित्रपटात अजयला ॲक्शन टीमचा हिस्सा बनवले. सेट वरील माहोल कसा असतो या सर्व गोष्टी त्यांनी अजयला शिकवल्या. यामुळेच सध्या फिल्म मेकींग मध्ये अजय खूप सक्षम दिसतो. ज्यावेळी अजयचे महाविद्यालयीन शिक्षण चालू होते त्यावेळी तो शेखर कपूरला दुश्मनी या चित्रपटात पार्ट टाइम असिस्ट करायचा. त्यावेळेपर्यंत अजय ने चित्रपटात येण्यासंबंधी कोणताच निर्णय घेतला नव्हता. मात्र एके दिवशी संध्याकाळी जेव्हा तो घरी परत आला त्यावेळी दिग्दर्शक संदेश/ कुकु कोहली हे त्याच्या वडिलांसोबत म्हणजेच वीरु देवगण सोबत बसले होते. वीरू यांनी अजयला सांगितले की संदेश फुल और काटे या नावाचा चित्रपट तयार करत आहेत. आणि या चित्रपटात ते तुला घेऊ इच्छितात.
या वक्तव्यावर अजय ची पहिली प्रतिक्रिया पागल झाला आहात का ? मी अजून फक्त अठरा वर्षांचा आहे. मला अजून माझं लाईफ एन्जॉय करायचं आहे अशी होती. संदेश यांच्या प्रस्तावाला अजयने नकार देऊन तो तेथून निघून गेला. ही गोष्ट १९९० मधील होती. आणि विशेष म्हणजे त्याच्या पुढच्या महिन्यात म्हणजेच नोव्हेंबर महिन्यात अजयने या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यास सुरुवात केली होती. अजयला हा चित्रपट वीरू यांनी त्याच्यावर घेतलेल्या मेहनतीमुळे तसेच तो वीरू देवगण यांचा मुलगा आहे म्हणून मिळाला.
Bollywood Updates On Just One Click