बॉलीवूड मध्ये सुपरस्टार ची कमी नाही. सध्या अनेक नवोदित कलाकारांची चलती बॉलिवूडमध्ये सुरू आहे. मात्र या कलाकारांना इंडस्ट्रीमध्ये सेट होण्यासाठी काही काळ जावा लागतो त्यानंतर ते नावारूपास येतात. यातील काही ही कलाकार असे असतात जे स्टार किड असल्यामुळे त्यांना लोक आधीपासून ओळखत असतात मात्र इंडस्ट्रीमध्ये नुसती ओळख असून चालत नाही तर त्या सोबत टॅलेंट असणे सुद्धा गरजेचे असते. म्हणूनच या नवोदित कलाकारांना इंडस्ट्रीमध्ये सेटल व्हायला थोडा वेळ लागतो. मात्र यातील काही कलाकार त्यांच्या पहिल्याच चित्रपटांमध्ये जादू दाखवतात आणि स्वतःच्या नावापुढे सुपरस्टार हा टॅग लावून घेण्यास यशस्वी होतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही अभिनेत्याने बद्दल सांगणार आहोत जे त्यांच्या पहिल्याच चित्रपटात सुपरस्टार ठरले.
१) अजय देवगन- बॉलीवूड मध्ये सिंघम या नावाने ओळखला जाणारा अभिनेता अजय देवगन त्याच्या पहिल्याच चित्रपटापासून नावारूपास आला होता. त्याने फुल और काटे या चित्रपटांमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. फुल और काटे हा त्या वर्षीचा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला होता. त्यानंतर अजयने अनेक हिट चित्रपट दिले यामध्ये गोलमाल सिरीज, सिंघम तसेच नुकत्याच येऊन गेलेल्या तानाजी या चित्रपटापर्यंत अजयने अनेक हिट चित्रपट दिले.
२) संजय दत्त- बॉलीवूड मध्ये बाबा या नावाने प्रसिद्ध असणारा अभिनेता संजय दत्त सुरुवातीला सहाय्यक अभिनेत्याची भूमिका पडद्यावर साकारायचा मात्र त्यानंतर त्याची प्रमुख भूमिका असलेला रॉकी हा चित्रपट आला आणि या चित्रपटाने त्याला सुपरस्टार बनवून टाकले. त्यानंतर संजय दत्तने अनेक हिट चित्रपट दिले. मध्यंतरी त्याच्या करिअरला उतरती कळा लागली होती मात्र यातूनही सावरून त्याने नव्याने सुरुवात केली आणि स्वतःचे सुपरस्टार हे पद टिकवून ठेवले. संजय दत्तने अग्निपथ, पानिपत यांसारख्या चित्रपटांमधून खलनायकी भूमिका सुद्धा साकारली आहे. संजय दत्तचा बायोपिक सुद्धा आला होता यामध्ये अभिनेता रणवीर कपूर ने त्याची भूमिका साकारली होती.
३) अमीर खान- वर्षाला फक्त एकच चित्रपट करणारा मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणजेच अभिनेता अमीर खान याने १९८९ मध्ये आलेल्या कयामत से कयामत तक या चित्रपटांमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिस वर सुपर डुपर हिट ठरला. या चित्रपटाने आमिरला प्रसिद्धी मिळवून दिली त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही आणि तो यशाची शिखरे चढतच राहिला. आमीरने तारे जमीन पर, पिके, थ्री इडीयट्स , दंगल यांसारखे सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले.
४) टायगर श्रॉफ- ॲक्शन हिरो म्हणून एकेकाळी प्रसिद्ध असणा-या अभिनेता जॅकी श्रॉफ यांचा मुलगा टायगर श्रॉफ हासुद्धा आताच्या काळात ॲक्शन हिरो म्हणूनच ओळखला जातो. टायगर ने हिरोपंती या चित्रपटांमधून पदार्पण केले होते. हा चित्रपट त्याला सुपरस्टार हा टॅग मिळवून देण्यात यशस्वी ठरला. त्यानंतर टायगर ने बागी या चित्रपटाचे दोन पार्ट तसेच स्टुडन्ट ऑफ द इयर २ आणि वॉर या चित्रपटांमध्ये काम केले.
५) ऋतिक रोशन- बॉलिवूडचा सर्वात हँडसम अभिनेता ऋतिक रोशन वर आज सुद्धा अनेक मुली जीव ओवाळून टाकतात. ऋतिकने २००० मध्ये आलेल्या कहो ना प्यार है या चित्रपटांमधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात त्याच्यासोबत अमिषा पटेल ने मुख्य अभिनेत्री म्हणून काम केले. हा चित्रपट यावर्षीचा सर्वाधिक चर्चेत असणारा आणि यशस्वी ठरलेला चित्रपट बनला. त्यानंतर ऋतिक ने कोई मिल गया, क्रिश, अग्निपथ, जोधा-अकबर, धूम यांसारखे हिट चित्रपट दिले.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !