Headlines

सोशल मीडियावर व्हायरल झाले ‘शाहरुख खान’च्या मुलाचे काही प्रायव्हेट फोटो !

बॉलिवूडमध्ये रोमान्सचा बादशहा म्हणून ओळखला जाणारा प्रसिद्ध अभिनेता शाहरुख खान नेहमीच चर्चेमध्ये असतो. मात्र हल्ली त्याच्याहून अधिक त्याची मुलं चर्चेमध्ये राहू लागली आहेत. शाहरुख खान ची मुलं अबराम खान, सुहाना खान आणि आर्यन खान यांच्याशी निगडित अनेक बातम्या समोर येतात. यातील काही बातम्या अजब असतात तर काही चांगल्या तर काही वाईट! सध्या या काळात शाहरुख खानचा मोठा मुलगा आर्यन खान खूप चर्चेत आला आहे.
नुकतेच शाहरुख खानच्या मोठ्या मुलाचे आर्यन खानचे काही वैयक्तिक फोटो व्हायरल झाले आहेत. तुम्ही पाहू शकता या फोटोमध्ये आर्यन खान एका मिस्ट्री मुलीसोबत डान्स करताना दिसत आहे. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो या दिवसात आर्यन खान एका विदेशी मुलीला डेट करत असल्याचे काही बातम्यांमध्ये सांगितले जात आहे. हे फोटो सुहाना खान च्या पेज वर शेअर केले गेले होते. यामध्ये आर्यन त्याच्या मैत्रिणी सोबत डान्स करताना दिसत आहे.
तसेच या फोटोमध्ये आर्यनने संपूर्ण काळ्या रंगाचे कपडे घातलेले दिसतात आणि त्याच्या मैत्रिणी लाल आणि काळ्या रंगाच्या कॉम्बिनेशन चे कपडे घातलेले दिसत आहेत. तसे पाहायला गेले तर हे फोटो जुने आहेत मात्र या काळात ते खूप व्हायरल होत आहेत.
हे फोटो समोर आल्यानंतर असे म्हटले जात आहे की ही मुलगी आर्यन खान ची गर्लफ्रेंड आहे. मात्र अजून ही गोष्ट खरे असल्याचा शिक्का मोर्तब झालेला नाही त्यामुळे सर्वजण आर्यनच्या उत्तराची प्रतिक्षा करत आहेत. सध्या आर्यन खान लंडनमध्ये त्याचे शिक्षण पूर्ण करत आहे. तो लंडनमधील साउर्थन कॅलिफोर्निया लॉस एंजलिस मधील युनिव्हर्सिटीमधून त्याचे ग्रॅज्युएशन पूर्ण करत आहे. तेथे तो फिल्म मेकिंग आणि रायटिंग चे सुद्धा शिक्षण घेत असल्याचे बोलले जाते.
आर्यन मे २००१ मध्ये आलेल्या कभी खुशी कभी गम या चित्रपटांमध्ये राहुल हे पात्र साकारणाऱ्या शाहरुख खान च्या बालपणीची भूमिका साकारली होती. हम है लाजवाब या ॲनिमेटेड चित्रपटात त्याने त्याचा आवाज डब केला होता. यासाठी त्याला बेस्ट डबिंग चाइल्ड आर्टिस्ट मेल हा पुरस्कार सुद्धा मिळाला. अजून एक बातमी समोर आली आहे ती म्हणजे आर्यन खानची ही मैत्रीण त्याच्या आईला गौरी खानला सुद्धा भेटली आहे. आर्यन खान बद्दल बोलायचे झाल्यास तो लवकर आज बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी सज्ज आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *