Headlines

मृत्यूनंतर नृत्यदिग्दर्शक ‘सरोज खान’ यांनी आपल्या कुटुंबीयांसाठी तब्ब्ल एवढी संपत्ती पाठीमागे सोडली !

प्रसिद्ध बॉलिवूड नृत्यदिग्दर्शक सरोज खान यांचे शुक्रवारी सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या ७१ वर्षाच्या होत्या. त्यांना तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार जिंकला होता. त्यांनी हिंदी चित्रपटातील खूप संस्मरणीय गाण्यांचे नृत्यदिग्दर्शन केले. चित्रपट श्रुष्टीमध्ये त्या मास्टर जी नावाने प्रसिद्ध होत्या. सरोज खान ह्या गेले ४ दशकं नृत्य दिग्दर्शक म्हणून काम करत होत्या. त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये २००० पेक्षा अधिक गाण्यांचे नृत्यदिग्दर्शन केले होते.
त्यांच्या हिट गाण्यांमध्ये मिस्टर इंडिया मधील हवा हवाई, काटे नहीं कटते ये दिन ये रात, चांदनी चित्रपटातील मेरे हाथों में नौ चूड़ियाँ हैं, अलबेला साजन आयो रे, बरसो रे मेघा मेघा, जरा सा झूम लू में आणि मेहंदी लगाके रखना यां गीतांचा समावेश आहे.
सरोज खान नर्तक, नृत्य दिग्दर्शक, ह्या हिंदी चित्रपटसृष्टीत अतुलनीय योगदानासाठी ओळखली जातात. निर्माते गौरी खानबरोबर तिने विविध प्रकल्पांमध्ये काम केले. कोरिओग्राफर होण्यापूर्वी त्यांनी १५०च्या नंतर आणि ६०व्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी पार्श्वभूमी नर्तक म्हणून त्यांच्या कारकीर्दीची सुरुवात केली.
त्या भारतातल्या सर्वात श्रीमंत नृत्यदिग्दर्शकापैकी एक होत्या. सर्वाधिक लोकप्रिय नृत्यदिग्दर्शकाच्या यादीतही त्यांचा समावेश होता. शेवटी त्यांनी निर्माता करण जौहरच्या निर्मितीतील “कलंक” या चित्रपटासाठी नृत्यदिग्दर्शन केले होते. त्यांनी माधुरी दीक्षितला “तबा हो गई” या गाण्यासाठी अखेरचे कोरिओग्राफ केले होते.
फोर्ब्स, आयएमडीबी आणि विविध ऑनलाइन संसाधने विकिपीडियाच्या मते, प्रसिद्ध नर्तक सरोज खान यांची संपत्ती १ ते ५ मिलियन डॉलर्स इतकी आहे. तर द टॉप एव्हरीथिंग या युट्यूब चॅनल च्या मते त्यांची संपत्ती ३६ कोटी आहे. व्यावसायिक नर्तक म्हणून त्यांनी बरीच कमाई केली आहे.

Tag – saroj khan property net worth