Headlines

गुलीगत… बँड इज बँड… बुक्कीत टेंगुळ गुलीगत… म्हणणाऱ्या सुरज चव्हाणची टिकटॉक बॅन वर प्रतिक्रिया !

भारत-चीन या दोन देशातील तणावाच्या वातावरणामुळे भारत सरकारने चिनी बनावटीच्या ५९ ॲप वर बंदी घातली आहे. या ५९ मध्ये सध्या सर्वात जास्त पॉप्युलर असलेल्या टिक टॉक या ॲपचा सुद्धा समावेश आहे. या ॲपवर बंदी घातल्यामुळे या निर्णयाबाबत काही ठिकाणी नाराजीचे सूर व्यक्त होत आहेत तर काही ठिकाणांहून या निर्णयाचे स्वागत केले आहे. टिक टॉक ॲप मुळे खेड्यापाड्यातील लोकांना सुद्धा त्यांच्यातील टॅलेंट दाखवण्यासाठी प्लॅटफॉर्म उपलब्ध झाला होता.
काही लोकांसाठी तर टिक टॉक म्हणजे जणू एक प्रकारचा उत्पन्नाचा मार्ग होता. एवढेच नव्हे तर काही जणांचे टिक टॉक वर पोट चालायचे. त्यामुळे या ॲप वर बंदी घातल्यामुळे पुढे कसे होईल याचा प्रश्न काही जणांना सतावत आहे. टिक टॉक वर घातलेल्या बंदी वर आपले मत व्यक्त करताना मराठी टिक टॉक स्टार सूरज चव्हाण ने त्याचे व्यक्त केले आहे.
कुठल्याही ही अॅप पेक्षा राष्ट्र प्रथम असे म्हणत गुलिगतने मोदी सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. गुलिगत चे मूळ नाव सूरज चव्हाण असे असून तो पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यामधील मोरटी मुर्वे या गावचा आहे. टिक टॉक ने जरी मला प्रसिद्धी मिळवून दिली, मला मोठे केले असले तरीही राष्ट्रहित महत्त्वाचे असे गुलिगत म्हणाला.
टिक टॉक या ॲप वर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ बनवून गुलिगत टिक टॉक चा मराठी स्टार सेलिब्रिटी म्हणून ओळखला जायचा. त्याने टिक टॉक वर १५ लाखांहून अधिक फॉलोवर्स कमावले होते. रोज वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ टिक टॉक वर पोस्ट करून तो स्वतःचे उदरनिर्वाह करायचा. यासाठी त्याला प्रति दिवस १ हजार रुपये मिळायचे. पण सरकारने अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे गुलिगतचे काम बंद झाले आहे.
सूरज चव्हाण बद्दल सांगायचे झाल्यास, त्याच्या लहानपणीच आईवडिलांचे निधन झाल्यामुळे घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची होती. त्याला ५ बहिणी असून चार बहिणींचे लग्न झालेले आहे व अजून एक बहीण लग्नाची बाकी आहे. टिक टॉक या माध्यमातून मिळालेल्या पैशाने त्यांनी नुकतेच त्याच्या घराचे काम सुरू केले होते. तसेच टिक टॉक माध्यमाद्वारे त्याला थोडीफार मदत सुद्धा मिळाली होती.
पण या अँप वर बंदी आल्यामुळे आता ती मदत सुद्धा बंद झाली असल्याचे त्यांनी सांगितले. टिक टॉक च्या बंद होण्यामुळे त्याच्यावर आर्थिक संकट आले असले तरीही राष्ट्रहित महत्त्वाचे असे त्याने ठामपणे सांगितले.

गुलीगत बँड इज बँड
बुक्कीत टेंगुळ गुलीगत…

सुरज चव्हाणचा हा फेमस डायलॉग असून आजही तो आपल्या चाहत्यांच्या विनंतीला मान देत, फेसबुक किंवा व्हिडिओच्या माध्यमातून हा डायलॉग परफॉर्मन्सद्वारे म्हणून दाखवत आहे. टीकटॉक बंद झाल्याचं दु:ख असून डोळ्यात पाणी येतंय. मात्र, टीकटॉक बंद झालं तरी आता युट्यूबवर आपण लाटा करू.. लाटा.. कसं गुलीगत. बँड इज बँड… सुरज चव्हाण लय बेक्कार… बुक्कीत टेंगुळ असेही तो आपलं दु:ख मनात ठेऊन हसत हसत म्हणतोय.
Tags – suraj chavan guligat brand is brand