जगभर पसरलेल्या कोरोनाव्हायरस पासून कोणीच वाचवू शकत नाही. या खतरनाक व्हायरसने बॉलिवूडच्या बिग बींच्या घरी शिरकाव केला. बच्चन कुटुंबात या व्हायरस ची लागण खुद्द अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय-बच्चन व त्यांची मुलगी आराध्या बच्चनला झाली.
नुकतेच अमिताभ बच्चन यांनी कोरोनाव्हायरस वर मात केली आहे. गेल्या महिन्यातच त्यांना कोरोनाव्हायरस ची लागण झाली होती. त्यानंतर उपचारासाठी त्यांना मुंबईतील विलेपार्ले येथे असणाऱ्या नानावटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
बिग बी आता ठीक असून स्वतःच्या घरी जलसा मध्ये क्वारंटाईन आहेत. नानावटी हॉस्पिटलमध्ये भरती झाल्यावर अमिताभ बच्चन यांना अनेक ट्रोलर्सचा सामना करावा लागला होता. आता अमिताभ बच्चन यांनी त्या ट्रोलिंगला खरमरीत उत्तर दिले आहे. मात्र यावेळी सोशल मीडियावर एका युजरने अमिताभ बच्चन यांच्या संपत्तीवर कमेंट केली.
झाले असे की, सोशल मीडियावर एका युजरने बिग बींना उद्देशून लिहिले की तुम्ही तुमची संपत्ती गरिबांना दान का करत नाही. मला विश्वास आहे की तुमच्या पाकिटात भरपूर प्रेम आणि देवाची कृपा खूप आहे. तुम्ही एक उदाहरण बनले पाहिजे . बोलणे सोपे असते मात्र तसे करून उदाहरण बनणे खूप महत्त्वाचे आहे. त्या युजरचे असे बोलणे बिग बींच्या मनाला खूप लागले आणि त्यांनी त्याच्याच भाषेत त्याला उत्तर दिले.
त्या युजरला उत्तर देताना अमिताभ बच्चन यांनी लिहिले की, लॉकडाउनच्या काळात आम्ही रोज ५००० लोकांना दुपारचे आणि रात्रीचे जेवण दिले. तसेच मुंबईहून स्वतःच्या घरी जाणाऱ्या १२००० मजुरांना शूज आणि चप्पल दिल्या. बिहार आणि यूपीला जाण्यासाठी मजुरांसाठी बस सेवा उपलब्ध करून दिल्या. २००९ मध्ये तर संपूर्ण ट्रेन मजुरांसाठी बुक केली होती.
अमिताभ बच्चन यांनी पुढे लिहिले की, जेव्हा काही राजकीय कारणांमुळे ट्रेन रद्द झाल्या होत्या त्या वेळेस इंडिगोच्या सहा विमानांमार्फत १८० पॅसेंजर्स ना त्यांच्या घरी पोहोचले. तसेच स्वखर्चाने १५००० पीपीई किट दिल्या आहेत, १०००० मास्क दिले आहेत. दिल्लीतील शीख समुदायाच्या चेअरमनला खूप दान केले कारण ते गरिबांना नेहमीच खायला-प्यायला देत असतात.
काही दिवसांपुर्वी एका महिलेने सोशल मीडियावर बिग बीं वर आरोप केले की ते नानावटी हॉस्पिटल ची जाहिरात करत आहेत. खरे तर त्या हॉस्पिटल ला लोकांच्या जीवाची पर्वाच नाही. त्यानंतर तिने बिग बीं वर टीका केली की, श्रीमान अमिताभ बच्चन, तुम्ही हॉस्पिटल ची जाहिरात करता ही खरंच दुःख जनक गोष्ट आहे. तुम्हाला लोकांच्या जीवाची परवा नाही तुम्हाला फक्त पैसा कमवण्याशी मतलब आहे. आता तुम्ही आमच्या मनात असलेला तुमच्या प्रतीचा सन्मान गमावून बसलात. यावर सुद्धा अमिताभ बच्चनने त्या महिलेस उत्तर दिले.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !