Headlines

उद्या बलिप्रतिपदा पाडवा, पाडव्याला नवऱ्याला का औक्षण केले जाते आणि बलिप्रतिपदेची सुरुवात कशी झाली जाणून घ्या !

दिवाळीचा सण हा तीन किंवा चार दिवसांचा असतो. या सणात प्रत्येक दिवसाला वेगळे महत्त्व असते. यातील बलिप्रतिपदेला कार्तिक शुक्ल प्रतिपदा असेही म्हणतात. बलिप्रतिपदेच्या दिवशी भगवान विष्णूंनी दैत्यराज बळीला पाताळात पाठवून त्याच्यामुळे सृष्टीची हानी होण्यापासून रोखले होते. असुरांचा राजा बळी, भक्त प्रल्हादाचा नातू आणि विरोचनाचा पुत्र होता. राक्षस कुळात जन्म घेऊनही तो चारित्र्यवान, विनयशील, प्रजाहितदक्ष राजा म्हणून ओळखला जायचा.

बलिराजा हा अति उदार वृत्तीचा होता. त्याच्या अशा स्वभावामुळे अपात्र लोकांच्या हाती गडगंज संपत्ती जाऊन भुतलावर गोंधळ माजला होता. त्याच्या वाढत्या शक्तीच्या प्रभावामुळे त्याने देवांचाही पराभव केला. बळीराजाला हरवण्यासाठी भगवान विष्णूची निवड करण्यात आली.

बळी राजाने एक यज्ञ केला या यज्ञात नंतर दान देण्याची प्रथा होती. त्यावेळी भगवान श्रीविष्णूंनी वामनावतार धारण करून बलीराजा कडे त्रिपाद भूमिचा वर मागितला. बळीराजाने तो वर दिल्यावर वामन देवाने मोठे विराट रूप धारण केले. त्यावेळी वामन देवाने पहिल्या दोन पावला मध्ये संपूर्ण पृथ्वी आणि अंतरिक्ष व्यापून घेतले. तिसरे पाऊल ठेवण्यासाठी जागा शिल्लक नसल्यामुळे तेव्हा बळीराजाने स्वतःचे मस्तक त्याच्या खाली ठेवले. आणि पाताळ लोकांचे राज्य वामन देवाला बहाल केले.

त्यावेळी बळीराजाने वर्षातून तीन दिवस पृथ्वीवर बळीराज्य असण्याचा वर मागितला होता. त्यामुळेच नरक चतुर्दशी, दिवाळीतील अमावस्या, बलिप्रतिपदा या तीन दिवसांना बलिराज्य म्हटले जाते.

बलिप्रतिपदा हा दिवाळीतील सण प्रामुख्याने महाराष्ट्र, उत्तर भारत आणि कर्नाटक मध्ये साजरा केला जातो. या दिवशी गोवर्धन पर्वताची आणि भगवान कृष्णाची पूजा केली जाते. त्यांच्यासोबतच या दिवशी राक्षसांचा राजा बलीची देखील पूजा होते. राजा बलीने वर्षातील तीन दिवस पृथ्वीवर येण्याचा वर मागितला होता. त्यामुळे या दिवशी बलीचे पृथ्वीवर आगमन होते म्हणूनच या दिवशी बलीची पूजा करतात. दक्षिण भारतात बलिराजाची पूजा ओणमच्या वेळी केली जाते तर भारतातील इतर भागात ही पूजा बलिप्रतिपदेला होते.

केव्हा साजरी होते बलिप्रतिपदा – बलिप्रतिपदा हा सण ऑक्‍टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात येतो. हिंदू कॅलेंडर नुसार कार्तिक महिन्यातील पहिल्या दिवशी बलिप्रतिपदा हा सण साजरा केला जातो. यावर्षी बलिप्रतिपदा १६ नोव्हेंबर ला साजरी होईल. प्रत्येक राज्यांमध्ये बलिप्रतिपदा वेगवेगळ्या प्रकारे साजरी केली जाते. या दिवशी विशेषतः हिंदू लोक एकमेकांच्या घरी जातात आणि केलेल्या फराळाचे पदार्थ एकमेकांना देतात. यामुळे राजा बलि आणि भगवान विष्णू प्रसन्न होतात.

या दिवशी सकाळी लवकर उठून संपूर्ण परिवार शरीराला तेल व उटणे लावून स्नान करतात. याला तेल स्नान असे म्हणतात. यामुळे शरीरातील बाहेरील अशुद्धी सोबतच मन सुद्धा साफ होते. यानंतर नवीन कपडे घातले जातात. घरातील महिला किंवा मुली घराबाहेर अंगणात किंवा मुख्य द्वारा बाहेर रांगोळी काढतात काही ठिकाणी ही रांगोळी तांदळाच्या पिठाने काढली जाते.

नंतर या दिवशी राजा बलि आणि त्याची पत्‍नी विंध्यावलीची पूजा करतात. यांचे प्रतिकात्मक स्वरूप म्हणून यादिवशी माती किंवा शेनापासून सात किल्ल्यांची आकृती बनवली जाते. सायंकाळी घराबाहेर दिवे आणि लाईटींगने सजावट केली जाते. मंदिरात देखील दिव्यांची विशेष आरास करून सजावट केली जाते. या दिवशी लोक देवाला प्रार्थना करतात की पृथ्वीवर पुन्हा एकदा लवकरात लवकर राजा बलिचे राज्य येऊ देत.

उत्तर भारतात या सणाच्या दिवशी जुगार खेळण्याची एक वेगळी प्रथा आहे. असे म्हटले जाते की या दिवशी भगवान शंकर आणि माता पार्वती हा खेळ खेळत होते यामध्ये माता पार्वती जिंकल्या. शिवपार्वती पुत्र कार्तिकेय आणि मारवाडी यांनी खेळला या पार्वती यांना कार्तिकेय जिंकले.

नंतर हा खेळ पुत्र गणेश आणि कार्तिकेय यांमध्ये खेळला गेला. गणपतीचा विजय झाला. आता काळानुरूप या प्रथेत थोडाफार बदल झाला आहे. आता बलिप्रतिपदेच्या दिवशी पत्त्यांचा खेळ संपूर्ण परिवार एकत्र येऊन खेळतो.

पती त्यांच्या पत्नींना भेटवस्तू देतात – महाराष्ट्रात या दिवसाला पाडवा देखील म्हणतात. या दिवशी राजा बलीची पूजा होते. पाडव्याला पंचरंगी रांगोळीने बळीची प्रतिमा काढून तिचे पूजन होते. ईडा पिडा टळो आणि बळीराजाचे राज्य येवो अशी प्रार्थना या दिवशी केली जाते.

साडेतीन शुभमुहूर्तांपैकी एक दिवस अत्यंत शुभ असतो. या दिवशी पत्नी त्यांच्या पतीचे औक्षण करतात आणि पती पत्नीला भेटवस्तू देतात. यामुळे दीर्घायुषी होतो असे मानले जाते.  नवविवाहीत दांपत्याची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी केली जाते ह्यालाच दिवाळसण असे म्हणतात. त्यानिमित्त यादिवशी जावयांस आहेर दिला जातो.

कर्नाटक आणि तामिळनाडू मध्ये या दिवशी केदार गौरी व्रत, गो पुजा, गौरम्मा पूजा होते. तिथे या दिवशी गोमातेची पूजा करण्यापूर्वी गो शाळा स्वच्छ केली जाते. या दिवशी मनापासून बलिराजाची प्रतिमा बनवली जाते. याआधी चौरंगावर रांगोळी काढतात त्यानंतर त्याच्यावर शेणा पासुन बनवलेली बलिराजाची प्रतिमा ठेवतात. त्यानंतर त्या प्रतिमेला झेंडूच्या फुलांनी सजवून त्याची पूजा केली जाते.

अश्विन महिन्यातील अमावास्येला लक्ष्मी पूजा झाल्यानंतर कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो. बलिप्रतिपदा हा सण व्यापाऱ्यांसाठी आर्थिक हिशोबाच्या दृष्टीने नववर्षाची सुरुवात असते. लक्ष्मी देवीची कृपादृष्टी रहावी यासाठी या दिवशी नवीन वह्यांचे पूजन करून व्यापारी लोक वर्षाची सुरुवात करतात. हळद-कुंकू , गंध, फूल, अक्षता वाहून व यांची पूजा केली जाते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !