Headlines

कानातला संपूर्ण मळ बाहेर काढा ह्या सहज सोप्या पद्धतीने कोणत्याही औषधाशिवाय, जाणून घ्या पद्धत !

काही वेळेस सर्दीमुळे कान गच्च होऊन जातो. किंवा कानात भरपूर मळ साठते. यामुळे आपल्याला कानामध्ये खूप खाज येते. अशावेळी आपण इयरबडने कान साफ करतो. काही व्यक्तीसोबत असेच काहीसे घडले, ते इयरबड कॉटन ने त्याचे कान साफ करत होता त्या वेळी चुकून तो इयरबड त्याच्या कानाच्या पडद्याला जोरात लागला त्यामुळे त्याच्या कानाचा पडदा फाटला. त्यामुळे त्याला कमी ऐकू येऊ लागले आणि कानातून पाणी बाहेर येऊ लागले.

त्रास जास्त होऊ लागल्यावर तो हॉस्पिटल मध्ये भरती झाला. तेथे तज्ञांनी त्याच्या कानाचा पडदा फाटल्या चे सांगितले. कानात साचल्यामुळे त्याला सतत खाज येत होती. औषधोपचाराने जर त्याचा कान बरा झाला नाही तर त्याच्या कानाचे सर्जरी करावी लागेल असे डॉक्टरांनी सांगितले. शहरातील व्यक्ती कान साफ करण्यासाठी इयरबडचा वापर करतात.

मात्र सतत कान साफ करण्यासाठी इयरबड वापरल्यास कानातील शिरांवर परिणाम होऊ शकतो आणि काही वेळेस फाटू शकतो. याशिवाय काहीवेळेस कानातील मळ बाहेर येण्या ऐवजी तो आत मध्ये जातो त्यामुळे अजूनच कान बंद होतो.
कानातील पडदा फाटल्यास इन्फेक्शन होऊ शकते.

कानातील पडदा फाटल्यास दोन प्रकारचे इन्फेक्शन होऊ शकते. यामुळे कानातील पडद्या मधील छिद्रात इन्फेक्शन होते तर पडद्या सोबतच कानामधील हाडदेखील दुखू शकते. कान आणि मेंदूच्या मध्ये एक बारीक हाड असते. जेव्हा कानाच्या पडद्यावर इन्फेक्शन होते त्यावेळी र*क्तवाहिन्यांत मार्फत मेंदू आणि त्याच्या सभोवतालच्या जागेवर सुद्धा ते इन्फेक्शन पोहोचते.

घातक आहे इयरबड – इयरबडचा वापर केल्यावर बऱ्याचदा कानातील मळ बाहेर येण्याऐवजी तो अजून आत जातो यामुळे कमी ऐकायला येते. तर काही वेळेस कानातून शिट्टी वाजल्यासारखा आवाज येतो. कानाचा पडदा खूप नाजूक असतो. त्यामुळे इयरबडसारखी मऊ वस्तूदेखील कानाच्या पडद्याला नुकसान पोहोचू शकते. यामुळे कानातील आतील त्वचा निघते.

इयरबडने कान साफ केल्यानंतर काही वेळेस त्यातील थोडा कापूस कानात राहतो. त्यानंतर आंघोळ करते वेळी पाणी कानात गेल्यावर तो कापूस ते पाणी शोषून घेतो यामुळे फंगल इन्फेक्शन होऊ शकते. जुन्या आणि घाणेरड्या इयरबडने कान साफ केल्यास कानात अजून मळ जातो यामुळे देखील इन्फेक्शन होते.

कान साफ करण्यासाठी चे घरगुती उपाय – बदामाच्या तेलाचा वापर करावा – कानातील मळ साफ करण्यासाठी कानात एक किंवा दोन थेंब बदामाचे तेल टाकून डोके त्याच बाजूला करून ठेवा जेणेकरून तेल खाली येणार नाही. पाच मिनिटे त्याच अवस्थेत राहा यामुळे कानातील मळ मऊ होऊन आपोआपच बाहेर येईल.

मोहरीच्या तेलाचा वापर – बदामाच्या तेला प्रमाणेच मोहरीचे तेल देखील वापरले जाऊ शकते पण मोहरीच्या तेलाचे गुणवत्ता चांगली असावी याची काळजी घेणे आवश्यक आहे. मोहरीच्या तेलाचा वापरामुळे कानातील मळ सैल होऊन ती सहज बाहेर येते.

बेबी ऑइलचा वापर करा – कान स्वच्छ करण्यासाठी बेबी ऑइल चा वापर केल्यास भरपूर फायदेशीर ठरते. यामुळे कानात जमा झालेले मळ वितळून ती बाहेर येते. यासाठी तुम्ही अर्धा चमचा बेबी ऑइल हलके गरम करून घ्या. आणि रोपच्या मदतीने दोन्ही कानामध्ये घाला. आणि काही वेळी स्थिर राहा. कोमट तेल कानात जाताच कानात गोटलेली मळ वितळून कान स्वच्छ होतात. काना संबंधित तुम्हाला जास्त त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

अस्वीकरण  दिलेल्या टिप्स आणि सूचना सामान्य माहितीसाठी आहेत. त्यांना कोणत्याही डॉक्टर किंवा वैद्यकीय शाश्त्राचा सल्ला असा समजू नका. आजारपण किंवा संसर्गाची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. दिलेल्या माहितीशी बॉलीरिपोर्ट सहमत असेलच असे नाही.