मनात जिद्द असेल तर माणुस कोणत्याही परिस्थितीवर मात करुन समोरील परिस्थितीला सामोरे जाऊ शकतो. अभ्यास करण्यासाठी मोठमोठे गडगंज पैसे घेणारे क्लास , अभ्यासासाठी लागणाऱ्या सर्व सुखसोयी उपलब्ध असतील तर चांगले यश संपादन होते असे नाही. अशी कित्येक उदाहरणे आहेत जी परिस्थिती नसताना देखील यशाच्या उंच शिखरावर गेली आहेत.
त्यातच अजुन एका उदाहरणाची भर झाली आहे ते म्हणजे प्रदीपकुमार जनार्धनची डोईफोडे. सिंदखेड राजा तालुक्यातील राहेरी खु येथील शेतकरी जनार्धन डोईफोडे यांचा हा मुलगा. एमपीएससी परीक्षेत पहिल्याच प्रयत्नांमध्ये भटक्या जमाती प्रवर्ग ‘ड’ (एनटी-ड)मधून राज्यांमध्ये मातृतीर्थ पहिला आला आहे. त्याला राज्यात २६ वी रॅंक मिळाली आहे.
येत्या काही दिवसातच प्रदिपकुमार राजपत्रित अधिकारी या पदावर कामासाठी रुजु होईल. प्रदिपकुमारच्या या यशाची बातमी समजताच संपुर्ण गावाने जल्लोष साजरा केला. विशेष म्हणजे त्याच्या कुटुंबात कोणीच प्रशासकिय सेवेत नाही इतर सर्व जण शेतकरीच पण प्रदिपकुमार ने त्याच्या मेहनतीच्या जोरावर हे काम करुन दाखवले.
प्रदिपकुमारने जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालय (एमजीएम)औरंगाबाद येथुन सिव्हिल इंजिनीअरिंगची पदवी मिळवली. त्याआधी त्याचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले तर माध्यमिक शिक्षण देऊळगांव राजा येथे झाले. मग औरंगाबादेत ११ वी १२ विज्ञान शाखेतुन शिक्षण घेतले. त्याचे वेळी तो स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता. पण घरची परीस्थिती बेताची असल्यामुळे त्याने कोणत्याही प्रकारचे क्लास लावले नाही. तो स्वताच्या हिमतींवर अभ्यास करु लागला.
जून २०१९ ला पूर्व परीक्षा दिली त्या परिक्षेमध्ये यश संपादन केल्यानंतर २४ नोव्हेंबर २०१९ मुख्य परिक्षा दिल्यानंतर त्यांचा निकाल २०२१ ला लागला. त्या निकालामध्ये उत्तीर्ण होऊन जानेवारी २०२२ ला विभागीय स्तरावर मुलाखत दिली. त्या मुलाखतीचा निकाल १२ फेब्रुवारी रोजी जाहीर झाला असुन प्रदीपकुमार जनार्धन डोईफोडे यांनी भटक्या जमाती प्रवर्ग ‘ड’ (एनटी-ड) मधून राज्यांमध्ये प्रथम येण्याचा मान तर राज्यांतून २६ वी रँक मिळवण्याचा बहुमान त्यांनी मिळविला.
मोठमोठ्या परीक्षा या केवळ शहरी विद्यार्थीच देऊ शकतात असे नाही.ृ ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी मनावर घेतले तर ते ही कोणत्याही प्रकारच्या क्लासेस विना परीक्षेमध्ये स्वतःच्या अभ्यासाच्या जोरावर पास होऊ शकतात हे प्रदिपकुमारने दाखवुन दिले आहे.
अभ्यास करत असताना त्यामध्ये सातत्य ठेवणे आवश्यक आहे. अभ्यासाचे सातत्य ठेवल्यामुळेच मी प्रशासकीय सेवेमध्ये दाखवू होवु शकलो.” असे मत प्रदिपकुमारने व्यक्त केले.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !