Headlines

८ वर्ष छोटे असलेल्या मुलासोबत लग्न केलं, आणि लग्नाच्या पहिल्याच वर्षी या कारणामुळे पाहिजे होता घ’ट’स्फो’ट : फराह खान !

कोरिओग्राफर आणि चित्रपट दिग्दर्शिका फराह खान ही तिच्या बेताल आणि बिनधास्त वागण्या बोलण्यासाठी प्रसिद्ध आहे. फराह 59 वर्षांची आहे. काही दिवसांपूर्वी तिने ‘स्वयंवर : मीका दी वोहती’ या रियलिटी शोमध्ये उपस्थिती लावली होती. तिथे तिने तिच्या वैवाहिक जीवनातील अनुभव सांगितले.

फराह म्हणाली, “मला वाटतं लग्नासाठी कोणतीही वयोमर्यादा नसते. जेव्हा तुम्हाला योग्य व्यक्ती सापडेल, तेव्हा तुम्ही लग्न करू शकता. मला तर माझ्या लग्नाच्या एक वर्षानंतरचआमच्या नात्यापासून दूर जायचे होते कारण आम्हाला जुळवून घेणे थोडे अवघड जात होते. फराहने शो मध्ये मिका सिंगला तिचा भाऊ म्हटले आहे. ती पुढे मिका बदद्ल म्हणाली की, “मिका खूप संवेदनशील व्यक्ती आहे, फक्त एक स्थिर मुलगी त्याला सांभाळू शकते.”

फराहबद्दल बोलायचे झाल्यास , तिने 9 डिसेंबर 2004 ला शिरीष कुंदरशी लग्न केले, तो एक फिल्म एडिटर आहे. विशेष म्हणजे तो फराहपेक्षा वयाने सुमारे 8 वर्षांनी लहान आहे. लग्नाच्या जवळपास 4 वर्षानंतर 2008 मध्ये शिरीष आणि फराहला तीन मुलं झाली, ज्यांची नाव त्यांनी जार, दिवा आणि आन्या ठेवले.

शिरीषने फराहसाठी ‘मैं हूं ना’, ‘ओम शांती ओम’ आणि ‘तीस मार खान’ या चित्रपटांचे एडिटिंग केले आहे. त्याने दिग्दर्शक म्हणून ‘जान-ए-मन’, ‘जोकर’ आणि ‘मिसेस सिरीयल खिलाडी’ सारख्या चित्रपटांसाठी काम केले आहे.

फराह खानने अलीकडेच तिच्या ‘तीस मार खान’ या चित्रपटाच्या अपयशाबद्दल सांगितले. ती म्हणाली होती, “तीस मार खानबद्दल लोकांनी खूप काही सुनावले .ते मला अजूनही आठवते. ‘तीस मार खान’मधील ‘शीला की जवानी’ गाण्यासाठी सर्वोत्कृष्ट कोरिओग्राफरचा पुरस्कार मिळाला होता. पण तरीही या चित्रपटानंतर मला घरातून बाहेर पडावेसे वाटत नव्हते.

तेव्हा माझ्या सासूबाईंनी मला प्रोत्साहन दिले. काळाच्या चढ-उतारासोबत मी मोठी आणि समजूतदार होत गेले. मला मुलं झाली. काळानुसार सगळं बदललं. जे आपलं आहे ते एक दिवस आपल्याकडे येणारच हे मला जाणवतं. एके काळी मी जे होते त्या गोष्टीचा आता मला राग येतो.

जेव्हा कोणाचा चित्रपट चांगला चालत नाही तेव्हा काहींना त्याचा आनंद होतो. हीच या इंडस्ट्रीची खासियत आहे. आज मला कळले की एखादा चित्रपट ज्याच्या नशिबात असेल त्याच्याबरोबरच तो बनवा.”

फराह खानने दिग्दर्शक 8 वर्षांपूर्वी 2014 मध्ये ‘हॅपी न्यू इयर’ हा चित्रपट दिग्दर्शित केलेला. जो बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. निर्माती म्हणून, तिने 2020 मध्ये पती शिरीष कुंदर दिग्दर्शित ‘मिसेस सीरियल किलर’ ची निर्मिती केली होती.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !