Headlines

आज बॉलिवूड इंडस्ट्रीवर राज करतोय, टॉपच्या अभिनेत्रीला सोबत घेऊन फिरतोय हा छोटा मुलगा, जाणून घ्या कोण आहे तो !

अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचे लहानपणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्यांचे काही चाहते त्यांच्या आवडत्या सेलिब्रिटींना ओळखण्यात यशस्वी होतात, तर काहींना त्यांना ओळखण्यात अपयश येते. सध्या बॉलिवूडमधील एका प्रसिद्ध अभिनेत्याचा फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. त्या फोटोत तो अभिनेता आनंदाने नाचताना दिसतो.

जर तुम्ही फोटोत दिसणार्‍या मुलाला ओळखले असेल, तर तुमच्यामध्ये काहीतरी खास आहे, पण जर तुम्हाला तो ओळखता आला नाही, तर याचा अर्थ तुम्ही खास नाही असा होत नाही. चला तर मग आम्ही तुम्हाला सांगतो कोण आहे तो मुलगा. फोटोत दिसणारा लहान मुलगा सध्याचा आघाडीचा अभिनेता रणवीर सिंग .

रणवीरचा व्हायरल होणारा हा फोटो स्वता त्याने4 वर्षांपूर्वी पोस्ट केला होता. या फोटोसोबत त्याने हवेत हात जसे मला डॉनसारखी कशाची पर्वाच नाही असे कॅप्शन दिले.


रणवीर 37 वर्षांचा झाला असून त्याचा जन्म 6 जुलै 1985 मध्ये मुंबईतच झाला. आजच्या काळात रणवीर सिंग हे बॉलिवूडमधील मोठे नाव आहे. रणवीरने त्याच्या करीअरची सुरुवात जाहिरात एजेंसीमध्ये कॉपी रायटर म्हणून केली होती. त्याचा लेखक म्हणून सुरु झालेला प्रवास आज यशस्वी अभिनेता म्हणून घोडदौळ करत आहे.


बॉलिवूडमध्ये येण्यापूर्वी जरी त्याने लेखक म्हणून काम केले असले तरी त्याच्या मनात अभिनेता व्हायचे हे पक्के होते. त्यामुळे तो सतत ऑडिशन द्यायचा. 2010 मध्ये आलेल्या बॅण्ड बाजा बारात या चित्रपटासाठी दिलेल्या ऑडिशनमध्ये निर्माता आदित्य चोप्राने त्याचे सिलेक्शन केले.

त्यात त्याला प्रमुख भूमिका साकारण्याची संधी मिळाली होती. रणवीरचा पहिला चित्रपट हिट झाला. त्यात त्याच्यासोबत अनुष्का शर्माने काम केले होते. पुढे रणवीर बॉलिवूडची आघाडीची नायिका दीपिका पादुकोणच्या प्रेमात पडला. काही वर्ष एकमेकांना डेट केल्यावर दोघांनी 2018 मध्ये लग्न केले.

रणवीरच्या कामाबद्दल बोलायचे झाल्यास त्याचा शेवटचा चित्रपट जयेश भाई जोरदार हा बॉक्स ऑफिसवर फारसा कमाल दाखवू शकला नाही. येणाऱ्या काही काळात रणवीर ‘सर्कस’,‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’या चित्रपटांत दिसणार आहे. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री आलिया भट्ट दिसेल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !