अभिनेत्री नोरा फतेही सध्या टीव्हीवरील डान्स दिवाने ज्युनियर्स या रियालिटी शो ची परीक्षक म्हणून काम करत आहे. एकादा ती सेटवर जात असताना मुसळधार पाऊस पडत होता, त्यामुळे तिला सेटवर जायला अडचण येत होती. त्यावेळी तिने गुलाबी रंगाची साडी नेसली होती. पण पावसात तिला ती साडी सांभाळणे मुश्किल झाले होते.
त्यावेळी तिच्या सुरक्षा रक्षकाने तिची साडी सावरण्यास मदत केली. यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कारमधून उतरल्यावर सेटवर जात असताना अचानक पाऊस आल्यामुळे नोराला सेटवर जाणे मुश्किल झाले. तिला पावसात भिजायला झाले.
तिची साडी ओली होत होती त्यावेळी तिचा सुरक्षा रक्षका तिच्या मदतीला धावला. त्याने तिची खाली लोळणारी साडी पकडली आणि तिला तिच्या व्हॅनिटी व्हॅनमध्ये नेले. सध्या हा व्हिडीओ व्हायरल होत आहे. काही जण हा व्हिडिओ पाहून तू स्वताला राणी समजतेस का असे म्हणत ट्रोल करत आहे.
पावसात सेटवर जाताना सुरक्षा रक्षकाची मदत घेणे नोराला खूप भारी पडले. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये नोरा छत्री घेऊन पावसापासून स्वत:चे रक्षण करत असल्याचे दिसते पण त्याचवेळी तिचा सुरक्षा रक्षक मात्र पावसाची पर्वा न करता ओला होऊन तिची साडी सांभाळत असल्याचे दिसते.
लोकांना ही गोष्ट अजिबात न आवडल्यामुळे ते नकरात्मक प्रतिक्रिया देत आहे. एकाने कमेंटमध्ये लिहिले की- गरीब व्यक्तीत नेहमीच श्रीमंत व्यक्तीला पाठिंबा देण्याची हिंमत असते. तर आणखी एक म्हणाला , स्वतः कपडे घाला आणि दुसऱ्याने त्यांची काळजी घ्या. आणखी एकाने यावर मजेशीर कमेंट करत पावसात नेहमी शॉर्ट्स आणि साडी घाला असे म्हटले आहे.
एकजण म्हणाला, मला व्हॅनिटी व्हॅनमध्ये जायचे असते तर मी आधी काहीतरी कॅज्युअल घातले असते आणि नंतर तिथे जाऊन बदलले असते. एकाने रागाने लिहिले – नोराला मदत करण्यासाठी भिजत असलेल्या गरीब माणसाचा विचार करा, निदान त्याच्यावर छत्री तरी धरा.
दुसरा म्हणाला, तिला स्वतःची साडी घेता येत नाही का , दुसर्याने लिहिले , भारतातील जवळजवळ सर्व स्त्रिया साड्या नेसतात आणि इतक्या सुंदरपणे नेसतात तसेच त्या नेसून लोकल ट्रेनमध्ये प्रवास देखील करतात. मग तुम्ही का तुमची साडी उचलू शकत नाही, नसेलच जमत तर असे कपडे का घालता?
नोरा फतेही अधिकतर चित्रपटांमध्ये आयटम डान्स करताना दिसते. ती एक उत्तम डान्सर आहे. तिच्या डान्सचे अनेकजण चाहते आहेत. सध्या ती डान्स दिवाने ज्युनियर या टीव्ही शो ला जज करत आहे. तिच्यासोबत या शोमध्ये नीतू सिंग आणि कोरिओग्राफर मार्जी हे देखील जज आहेत. करण कुंद्रा हा शो होस्ट करत आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !