अभिनेत्री माधुरी दीक्षित यांच्या विषयी नवीन खबर आली, त्यांची इच्छा नसतानाही त्यांना या कारणामुळे देश सोडावा लागला !

bollyreport
2 Min Read

बॉलिवूडची धकधक गर्ल अभिनेत्री माधुरी दिक्षितच्या चाहत्यांची संख्या जगभर पसरली आहे. माधुरीचे इंडस्ट्रीत जे स्थान आहे ते कमावयला कलाकारांना भरपूर मेहनत घ्यावी लागेल. माधुरीने आतापर्यंतच्या तिच्या कारकिर्दीत भरपूर नाव, सन्मान आणि पैसे कमावले. संपूर्ण सिनेइंडस्ट्रीला आपल्या अदांनी घायाळ करणारी माधुरी खूप अलिशान जीवन जगते.

माधुरीने काही दिवसांपूर्वी तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काही खुलासे केले त्यामुळे ती सध्या मीडियामध्ये चर्चेचा विषय बनली आहे. माधुरीने एका मुलाखतीत तिला लग्नानंतर बॉलिवूडपासून दूर का रहावे लागले तसेच तिला भारत सोडून का जावे लागले ते सांगितले.

आजपासून 10 वर्षांपूर्वी माधुरीचे नाव ही इंडस्ट्रीमधली एक प्रकारची जादू होती. तिच्या नुसत्या नावाने चित्रपट हिट व्हायचे . तिच्या सौंदर्याचे जग दिवाणे होते. पण लग्नानंतर माधुरीचे आयुष्य पुर्णपण बदलुन गेले.

लग्नानंतर तिला तिचा नवरा श्रीराम नेने हे अमेरिकेत डॉक्टर असल्यामुळे बॉलिवूडपासून दूर राहावे लागले होते. माधुरीचे पती अमेरिकेलाच राहयचे त्यामुळे मनात नसतानाही तिला भारत सोडून अमेरिकेत स्थायिक व्हावे लागले होते.


लग्नानंतर तिचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले. ती अक्षरशा बॉलिवूडमधून नाहीशी झाली. त्याचे कारण म्हणजे तेव्हा माधुरी आई झाली होती. तिला तिच्या मुलांचे पालपोषण करायचे होते. तिचे आई असल्याचे कर्तव्य तिला निभावायचे होते. त्यासाठी तिने स्वताला बॉलिवूडपासून लांब ठेवले. हळूहळू माधुरीची मोहिनी कमी होऊ लागली तिला सगळे विसरु लागले पण त्याच वेळी तिने पुन्हा कमबॅक केले.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Share This Article
I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.