Headlines

घ’ट’स्फो’टा’नंतर समंथाची अजब मागणी, मला जर नागा चैतन्य सोबत खोलीत बंद केलं तर मला …. !

बहुचर्चित असा कॉफी विथ करणचा 7 वा सीजन सुरु झाला आहे या सीजनच्या पहिल्या भागात रणवीर आणि आलिया तर दुसऱ्या भागात जान्हवी आणि सारा अली खानने उपस्थिती लावलेली. आता या शो चा तिसरा भाग पण प्रदर्शित झाला असून या भागात अक्षय कुमार आणि सामंथा रुथने उपस्थिती लावली होती.

सामंथाचे नाव येताच तिच्यासोबत तिच्या एक्स पतीचे म्हणजेच नागा चैतन्यचे नावही आपसूकच येत. सामंथा तिच्या आणि नागा चैतन्यच्या नात्याबदद्ल काय बोलणार यावर सगळ्यांचे लक्ष लागले होते. सामंथाने करणसोबत याविषयावर मनमोकळे पणाने गप्पा मारल्या.

या शो मध्ये सामंथाने नागा चैतन्यबद्दल असे काही म्हटले ज्यावरुन ते आता इतर कपलप्रमाणे चांगले मित्रही नाही हे लक्षात येते. शो मध्ये करणने सांमथाला विचारले की तुमच्याबाबतीत तु तुझ्या पतीकडे वेगळे होण्याची मागणी केली असशील.

यावर सामंथा करणला मध्येच रोकत म्हणते की पती नाही, एक्स पती. त्यानंतर करणने सामंथाला तिच्या मनात नागा चैतन्यसाठी कोणत्या फिलिंग्स आहेत का असे विचारले. सामंथाने त्यावर खूपच अनपेक्षित उत्तर दिले.


सामंथाने सांगितले की सध्या तरी आम्हाला एकमेकांबद्दल खूपच हार्ड फिलिंग्स आहेत. जर तुम्ही आम्हाला एका खोलीत एकत्र बंद केले तर कोणत्याही धारदार किंवा टोकदार वस्तू तुम्हाला आमच्यापासून लपवाव्या लागतील. सध्या तरी परिस्थिती ठिक नाही. पण कदाचित भविष्यात काही बदल होऊ शकतो.

सामंथा आणि नागा चैतन्यने काही वर्षे एकमेकांना डेट केल्यावर 2017 मध्ये लग्न केले होते. पण 2 ऑक्टोबर 2021 ला त्यांचा घ’ट’स्फो’ट झाला. शो मध्ये करणने सामंथाला प्रश्न विचारला की जेव्हा ती चैतन्यसोबत वेगळी झाली तेव्हा तुला ट्रोलिंगची भीती वाटली होती का.. यावर सामंथा म्हणाली की चाहत्यांसमोर स्वताच आयुष्य खुल करणे ही माझी चॉइस होती.

त्यामुळे मी यावर कोणतीही तक्रार करणार नाही. कारण सर्व काही पारदर्शक रहावे अशी माझा निर्णय होता. त्यामुळे मी आता यावर कोणतीच तक्रार करु शकत नाही आणि दुखीही होऊ शकत नाही. तसेच लोक किंवा चाहते माझ्यावर खूप प्रेम करतात त्यामुळे मी यावर काहीही बोलणार नाही.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !