सध्याची आघाडीची अभिनेत्री म्हणून कियारा अडवाणीचा बोलबोला आहे. कियारा तिच्या अभिनयासोबतच तिच्या सौंदर्यासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. अनेकदा ती वेगवेगळ्या फॅशनचे कपडे घालून मिडियाला पोज देत असते. तिची फॅशन सध्याच्या तरुणी खूप फॉलो करतात. पण अशाच एका फॅशनच्या नादात कियारा उप्स मुमेंटची शिकार झाली होती.
कियाराने एकदा असा काही ड्रेस घातला होता ज्यामुळे ती उप्स मुमेंटी बळी जाणार होती. त्यावेळचा तिचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. व्हिडिओत कियाराने निळ्या रंगाचा हाय लो ड्रेस घातला होता. तिला पाहताच तिथे उपस्थित असलेले पापाराझी फोटोसाठी तिच्याकडे धावू लागले.
कियाराने सुद्धा त्यांना विरोध न करता मनापासून त्यांना फोटोसाढी पोज दिल्या. पण त्याच वेळी असे काही घडले ज्यामुळे तिला तिथून सटकणे योग्य वाटले. फोटोसाठी पोज देत असताना हवेची झुळुक आली आणि कियाराचा ड्रेस उडू लागला.
त्यामुळे पोज सोडून ती आपला ड्रेस सांभाळू लागली. पायऱ्यावरुन जाताना सुद्धा तिचा ड्रेस हवेने उडू लागला होता. त्यामुऴे तिने लगेचच तो आपल्या हाताने पटकन पकडला.
View this post on Instagram
कियारा अडवाणी यापूर्वी ‘भूल भुलैया 2’ आणि जुग जुग् जियो या चित्रपटात दिसली होती. या चित्रपटातील या कियाराच्या कामाचे सर्वांनी कौतुक केले होते. या चित्रपटांतील गाण्यांवर कियाराने जबरदस्त डान्सही केला होता. चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली.
कियारा पहिल्यांदा फुगली या चित्रपटात दिसली होती. मात्र तिला खरी ओळख एमएस धोनी या चित्रपटातील धोनीची पत्नी साक्षी सिंग रावत या पात्रामुळे मिळाली. या चित्रपटात तिने सुशांत सिंह राजपूतसोबत काम केले होते. त्यानंतर तिच्या पदरी सर्वात मोठे यश आले ते कबीर सिंग या चित्रपटातून. पुढे शेरशहा या चित्रपटात तिची भूमिका खूपच कौतुकास्पद होती. या चित्रपटापासूनच तिचे नाव अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा सोबत जोडले गेले.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !