प्रत्येक धर्मामध्ये कोणता ही सण, कार्यक्रम, विधी हे त्या त्या परंपरेनुसार चालत आलेल्या असतात. हिंदू धर्मामध्ये बाळाच्या जन्मापूर्वी ते जन्मापासूनचं वेगवेगळे कार्यक्रम केले जातात. या गोष्टीला एक परंपरागत जोड देखील आहे. हिंदू धर्मामध्ये गरोदर स्त्रीची सातव्या महिन्यामध्ये ओटभरणी केली जाते. हा ओटभरणीची कार्यक्रम झाल्यानंतर त्या गरोदर स्त्रीला तिच्या माहेरी पाठवले जाते. पण काय असतो हा ओटभरणीचा कार्यक्रम? गरोदर स्त्रीला तिच्या माहेरी का पाठवले जाते? चला तर मग आज जाणून घेऊया काय असतो हा ओटभरणीचा कार्यक्रम?
ओटभरणीचा कार्यक्रमामध्ये गर्भामध्ये असलेल्या बाळाच्या निरोगी आयुष्यासाठी पूजा केली जाते. या वेळी विशेष पूजा करून गर्भामध्ये असणाऱ्या दोषांचे निवारण केले जाते, जेणेकरून ते बाळ सुदृढ व निरोगी राहील. या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्या बाळाला व त्याचा आईला थोरा-मोठ्यांचा आशिर्वाद देखील मिळतो.
ओटभरणीचा कार्यक्रमामध्ये त्या गरोदर स्त्रीची ओटी भरली जाते, त्या ओटीमध्ये सुखा मेवा, फळे अशा पौष्टिक पदार्थांचा समावेश असतो. हे पदार्थ खाल्ल्याने शक्ती तर येतेच पण सोबतच यांमधील तेलीय गुणांमुळे चिकटपणा येतो आणि त्यामुळे प्रसूतीच्या वेळेस स्त्रीला कमी त्रास होतो व बाळाचे स्वास्थ्य ही टिकून राहते.
दुसरं कारण असं आहे की ओठभरणीचा कार्यक्रम झाल्यानंतर गरोदर स्त्रीला तिच्या माहेरी पाठवले जाते, जेणेकरून ती पूर्णवेळ आराम करेल आणि बाळ व आई दोघेही सुदृढ व निरोगी राहतील. ओठभरणीच्या वेळेस त्या नवजात बालकासाठी एक विशेष पूजा केली जाते, ज्यामध्ये त्या बाळावरील जे काही दोष असतील ते नष्ट व्हावेत आणि या ओठभरणीच्या वेळेस जी पूजा केली जाते, त्यामुळे गर्भामध्ये असलेल्या बालकामध्ये सकारात्मकतेचा संचार होतो आणि आई व बाळ दोघे ही निरोगी राहतात.
Bollywood Updates On Just One Click