Headlines

अभिनेत्री परिणीती चोप्राने केले तिच्या आयुष्यातील सर्वात कमी कपड्यात बोल्ड फोटोशूट, फोटो पाहून … !

बॉलिवूड अभिनेत्री परिणिती चोप्रा सध्या आपला आगामी चित्रपट कोड नेम : तिरंगासाठी चर्चेत आहे. आपल्या ड्रिम प्रोजेक्टवर काम करायला मिळाल्याने अभिनेत्री खूप खुश आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झाला. या ट्रेलरला सुद्धा प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. परिणिती आता आपल्या कामातून वेळ काढत मालदिव्सला सुट्ट्यांचा आनंद घेण्यासाठी गेली आहे.

परिणितीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर काही फोटो शेअर केले आहेत. पहिल्या पोस्टमध्ये परिणितीने नियॉन रंगाची बिकीनी घातली आहे. या फोटोसाठी सुद्धा तिने बिकीनी शूट असे कॅप्शन दिले आहे. तर दुसऱ्या फोटोत तिने जिमचे कपडे घातलेले पाहायला मिळतात. त्या फोटोसाठी तिने, माझे जिम तुमच्या जिमपेक्षा चांगले आहे.

माझी स्वत:ची अॅक्शन ट्रेनिंग सुरु आहे….कोड नेम तिरंगाला भरपूर प्रेम देण्यासाठी धन्यवाद… मी आणखी एका अॅक्शन फिल्मसाठी तयार आहे.


परिणितीचे चाहते तिच्या दोन्ही पोस्टचे खूप कौतुक करत आहेत. तसेच तिच्या फोटोंना खूप लाइक्स आणि कमेंट करत आहेत. चित्रपटाबद्दल बोलायचे झाल्यास त्यात आपल्या परिणिती आणि हार्डी संधूची प्रेमकहाणी पाहण्यास मिळणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by (@parineetichopra)


या चित्रपटात परिणिती आणि हार्डीसोबतच शरद केळकर, दिव्येंदु भट्टाचार्य, शिशिर शर्मा, सब्यसाची चक्रवर्ती यांसारखे कलाकरार महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

कोड नेम: तिरंगा ही एक अॅक्शन थ्रिलर स्पाय लव्ह स्टोरी आहे. या चित्रपटात परिणिती रॉ एजंटची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट टी-सीरीज, रिलायन्स एंटरटेनमेंट आणि फिल्म हँगरच्या बॅनरखाली तयार केला जात आहे तर भूषण कुमार आणि कृष्ण कुमार हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन रिभू दासगुप्ता यांनी केले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by (@parineetichopra)


मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !