Headlines

एवढी प्रेम प्रकरणे असूनही सलमान अजूनही आहे व’र्जि’न, स्वतःच सांगितले यामागचे कारण, जाणून घ्या !

बॉलिवूडच्या भाईजानची प्रेमप्रकरणं सगळ्या इंडस्ट्रीमध्ये प्रसिद्ध आहेत. चित्रपटांमध्ये तो जसा त्याच्या हीरोइन बगलत असतो तशाच खऱ्या आयुष्यात त्याने त्याच्या गर्लफ्रेंड बदलल्या आहेत. शाहनीं जेफरी,ऐश्वर्या राय, ज़रीन खान ते कतरिना कॅफपर्यंतच्या अभिनेत्री त्याच्या गर्लफ्रेंड होत्या.

त्याच्या गर्लफ्रेंड मोजायला गेल्यास सकाळची रात्रच होईल. पण सलमानने करण जोहरच्या कॉफी विथ करण या शो मध्ये अशा काही गोष्टी सांगितल्या ज्या ऐकून तुम्ही नक्कीच चकीत व्हाल.

प्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक करण जोहरच्या कॉफी विथ करणचा 7 वा सीजन आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे. या शो चा प्रिमियर शो 7 जुलैला डिज्नी हॉटस्टारवर होणार असल्याचे बोलले जाते.

पण कॉफी विथ करण या शोच्या 4 थ्या सीजनमधील पहिला एपिसोड पाहिला असेल तर त्यात अभिनेता सलमान खान पाहुणा म्हणुन आला होता. त्यावेळी सलमानने तो व’र्जि’न असल्याचे म्हटले होते. त्याचे ते विधान त्यावेळी खूप गाजले.
2013 मध्ये हा एपिसोड प्रसारित झाला होता.

त्यावेळी त्याच्या या विधानामुळे प्रेक्षकांसोबतच करण जोहरही आश्चर्यचकित झालेला. या विधानानंतर सलमानने सांगितले की मी माझ्या होणाऱ्या पत्नीसाठी स्वताला वाचवत आहे. पुढे करणने सलमानला तू अजूनही सिंगलच आहेस का असे विचारले तेव्हा त्याने सांगितले की हो मी अजूनही सिंगल आहे. तू कोणासोबत शारीरिक संबंध ठेवलेस का या करणच्या प्रश्नावर सलमानने नाही असे उत्तर दिले.

पुढे सलमानने मजेत म्हटले की त्याचे खूप मित्र आहेत पण ते काहीच कामाचे नाहीत. कॉफी विथ करणच्या 7 व्या सीजनबद्दल बोलायचे झाल्यास या शो चे निर्माते त्याचे जोरदार प्रमोशन करत आहेत. सोशल मीडियावर सुद्धा त्याचे अनेक टीझर आणि प्रोमो प्रसारित होत आहेत. नुकताच त्यांचा आणखी एक टीझर रिलीज झाला असून त्यात करण सांगत आहे की हा नवा सीजन आधीच्या सीजनपेक्षा खूप मोठा, चांगला आणि खूप सुंदर असेल.

या नव्या सीजनमध्ये विक्की कौशल- कैटरीना कैफ, अक्षय कुमार, सामंथा रूथ प्रभु, अनन्या पांडे आणि विजय देवरकोंडा यांच्यासारख्या बॉलिवूड कलाकारांसह साऊथकडील कलाकारही उपस्थिती लावणार आहेत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !