Headlines

ऐन प्रेग्नंन्सी मध्ये सोनम कपूरचे बिना मेकअप हॉट फोटोशूट, फोटोज पाहून वेडे व्हाल !

अभिनेत्री सोनम कपूरने काही दिवसांपूर्वीच ती गरोदर असल्याची गोड बातमी दिली होती. सध्या ती तिच्या आई होण्या आधीचा काळ मजेत घालवत आहे. सोनमने 4 वर्षांपूर्वी दिल्लीतील उद्योजक आनंद आहूजासोबत लग्न केले होते. 21 मार्च 2022 ला ती गरोदर असल्याची माहिती सोनमने तिच्या सोशल मीडिया पोस्टमधून दिली.

सोनम सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. इन्स्टाग्रामवरसुद्धा तिच्या फॉलोवर्सची संख्या मोठी आहे. सोनम सोशल मीडियावर तिच्या वैयक्तिक जीवन घडणाऱ्या अनेक क्षणांचे फोटो पोस्ट करत असते. सोनमने तिच्या बेबी बंपचे फोटोसुद्धा सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.

सोनम कपूर काही दिवसांपूर्वी तिचा बेबीमून साजरा करण्यासाठी इटलीला गेलेली. तिने तिथले अनेक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेले. पण त्यातल्या काही फोटोंमुळे तिला ट्रोल देखील करण्यात आले.

त्यात सोनमने मेकअप न करता फोटो पोस्ट केले होते. लोकांच्या मते मेकअप न करता सोनम फारशी चांगली दिसत नव्हती. ती एका सर्वसाधारण मुलींप्रमाणेच दिसत होती. काही लोक तर तिला त्या फोटोत ओळखू शकले नाही. सोनमच्या त्या नो मेकअप लूकची लोक खूप फिरकी घेत आहे.

सोनमच्या त्या फोटोंवर एका युजरने कमेंट केली की पहिल्यांदा मी तो फोटो पाहिल्यावर मला ही पूनम पांडे वाटली, तर दुसऱ्या यूजरने लिहिले , सोनमला डॅण्ड्रफ झाल्यासारखे वाटते, तर आणखी एका यूजरने म्हटले की ही नक्की सोनमच आहे ना मी तर हिला ओळखूच शकलो नाही. एका यूजने सोनमची फिरकी घेत , हो फोटो पाहून मला , मी नुकताच हॉरर चित्रपट पाहिल्यासारखे वाटते. असे म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by HT City (@htcity)

“>
सोनम 36 व्या वर्षी आई बनणार आहे. तिने 2007 मध्ये सावरिया चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तिने अनेक चित्रपटात काम केले. पण तिला त्यात तिच्या वडीलांसारखे यश कमावता आले नाही. सोनम सर्वात शेवटी 2020 मध्ये एके वर्सेस एके या चित्रपटात दिसली होती.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !