Headlines

प्रसिद्ध गायक के के यांची चिता जळत असताना त्यांचा मुलगा आणि पत्नी हसत होती, लोक चिडले म्हणाले … !

काही दिवसांपूर्वीच संगीत विश्वातील प्रसिद्ध गायक केके यांचा ह्रदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. केके चे पूर्ण नाव कृष्णकुमार कुन्नथ असे होते. ते 53 वर्षांचे होते. कोलकत्यातील एका लाइव्ह कॉन्सर्टनंतर त्यांचा हॉटेलमध्ये गेल्यावर मृत्यू झाला.

केकेच्या अशा अचानक जाण्यामुऴे त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. केके यांनी त्यांच्या करीअरमध्ये अनेक सुपरहिट गाणी गायली. त्याच्या गाण्यांच्या स्वरुपात तो लोकांच्या मनात कायम जीवंत राहिल. केकेने कोलकाता येथे लाइव्ह कॉन्सर्ट केला होता. त्यावेळी तिथे हजारोंच्या संख्येत त्याचे चाहते आले होते.

पण त्या दिवशी त्याची तब्येत ठीक नव्हती. आपली तब्येत बरी नसल्याचे तो मंचावरील आपल्या सहकाऱ्यांना वारंवार सांगतही होता. त्याने कॉन्सर्ट दरम्यान स्टेजवरील स्पॉटलाइट बंद करण्यास सांगितली होती. रात्री 8.30 वाजता कॉन्सर्ट संपवून ते हॉटेलकडे रवाना झाला.

हॉटेलवर गेल्यानंतरही केकेच्या तब्येतीत काहीच सुधारणा होत नव्हती. केकेला हॉटेलमध्ये हृदयविकाराचा झटका आल्याचे बोलले जाते. तेव्हा त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले, पण तो वाचू शकला नाही. त्याचे कुटुंबीय आणि डॉक्टरांनी रात्रीच केकेच्या मृत्यूची बातमी सगळ्या्ंना दिली.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)

“>
कोलकाता येथेच केकेचे पोस्टमार्टम करण्यात आले. त्यानंतर त्यांचे पार्थिव मुंबईतील अंधेरी येथील त्यांच्या घरी आणण्यात आले. येथे त्यांचे पार्थिव फुलांनी सजवलेल्या पांढऱ्या कारमधून वर्सोवा येथील हिंदू स्मशानभूमीत नेले. मुंबईतील त्याच्या चाहत्यांसोबत उदित नारायण, सलीम मर्चंट, राहुल वैद्य, जावेद अली यांसारख्या बॉलीवूडमधील सेलेब्सनी त्याला अंतिम श्रद्धांजली अर्पण करून निरोप दिला.

केकेला त्यांच्या मुलाने मुखाग्नि दिला. त्यावेळी त्याचे संपूर्ण कुटुंब तिथे उपस्थित होते. स्मशानभूमीतले त्यांचे फोटो व्हायरल होत आहे. पण त्या फोटोत केकेची पत्नी आणि मुलगा चक्क हसताना दिसत आहे. ते पाहिल्यावर केकेच्या चाहत्यांचा भडका उडाला आणि त्यांनी सोशल मीडियावर नकारात्मक प्रतिक्रिया दिल्या आहेत.


एका युजरने कमेंटमध्ये रागात लिहिले की, “मी इथे रडत आहे आणि ते हसत आहेत… खरचं..” एकाने लिहिले की, “ते कसे हसतील”. दुसर्‍या युजरने “ते का हसत आहेत आणि केकेचा फोटो खुर्चीवर एकटा का आहे” अशी कमेंट केली. आणखी अनेक चाहत्यांनी केकेचा मुलगा आणि पत्नीसाठी रागात कमेंट केल्या आहेत.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !