बॉलीवूड चित्रपट मधले की त्यामध्ये मालमसाला हवाच. प्रेक्षकांची रुची लक्षात घेऊन चित्रपट दिग्दर्शक चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या अतिशयोक्ती सीन्सचा भडीमार करतात. त्यामुळे बॉलिवूडमध्ये सध्या किसिंग सीन असणे ही अगदी सहज गोष्ट मानली जाते. यापूर्वी एक काळ असाही होता जेव्हा किसिंग सीन न दाखवता सुद्धा चित्रपट सुपरहिट व्हायचे. त्या काळच्या चित्रपटांमधून चित्रपटाची गोष्ट आणि भारतीय संस्कृतीचा परिचय व्हायचा.
आता तो काळ नाहीसा होत चालला आहे. शिवाय चित्रपटांमध्ये या सीन्सची मागणी खूप वाढत चालली आहे. मात्र असे असून देखील आजच्या काळात अशाही काही अभिनेत्री आहेत ज्या अशा प्रकारचे सीन्स अजिबात करत नाहीत. आज आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्री बद्दल सांगणार आहोत.
तिने आतापर्यंत अनेक उत्कृष्ट चित्रपटांमध्ये अभिनय केला आहे मात्र अजूनही तिने कधीच किसिंग सीन्स दिलेले नाहीत. विशेष म्हणजे तिला अशा सीन्स साठी करोडो रुपयांच्या ऑफर येत असतात. चला तर जाणून घेऊ ही अभिनेत्री कोण आहे.
या अभिनेत्रीचे नाव कीर्ती सुरेश असून साऊथ फिल्म इंडस्ट्री मधील एक नावाजलेली अभिनेत्री आहे. साउथ फिल्म इंडस्ट्रीच्या या प्रसिद्ध अभिनेत्रीने आतापर्यंत अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. एवढेच नव्हे तर कीर्ती ने तिच्या सर्व उत्कृष्ट अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा जिंकला आहे.
अभिनेत्री कीर्ती सुरेश ने २००० मध्ये प्रदर्शित झालेल्या पायलटस् या चित्रपटामधून करिअरला सुरुवात केली होती मात्र मुख्य अभिनेत्री म्हणून कीर्तीने २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या मल्याळम चित्रपट गीतांजली मधून करिअरला सुरुवात केली. या चित्रपटाच्या वेळी तिचे महाविद्यालयीन शिक्षण चालू होते. शिक्षणाच्या शेवटच्या वर्षात या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाल्यामुळे अभ्यास व अभिनय या दोन्ही गोष्टी ती पार पाडत होती.
गीतांजली चित्रपटांमध्ये कीर्तीची दुहेरी भूमिका होती. एकीकडे अभ्यास व दुसरीकडे दुहेरी भूमिका साकारताना त्याचे तारेवरची कसरत झाल्याचे तिने एका मुलाखतीमध्ये सांगितले. कीर्ती सुरेश चा जन्म १ ऑक्टोबर १९९२ मध्ये झाला. कीर्तीने आतापर्यंत तमिळ, तेलगू आणि मल्याळम चित्रपटांमध्ये काम केले आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !