Headlines

आता कसलीही भीती नाही…या कारणामुळे शाहरुख खानने त्याचा बंगला प्लास्टिकच्या कव्हरने पूर्णपणे झाकला !

बॉलीवूडच्या झगमगत्या दुनियेत कलाकार चित्रपटांमध्ये काम करून बक्कळ पैसे कमावतात. या पैशातून ते वेगवेगळ्या प्रॉपर्टीमध्ये इन्वेस्ट करतात. बॉलीवूड कलाकारांसोबत त्यांचे बंगले सुद्धा त्यांच्यासारखेच जगप्रसिद्ध आहेत. अनेक वेळा बॉलिवूड कलाकारांच्या बंगल्यांची ओळख प्रेक्षणीय स्थळ अशी सुद्धा होते.
कलाकारांसोबत नाही तर किमान त्यांच्या घराबाहेर जाऊन सेल्फी काढण्यात या कलाकारांच्या चाहात्यांना आनंद मिळतो. यामध्ये अमिताभ बच्चनचा जलसा, प्रतिक्षा, सलमान खानचा गॅलक्सी अपार्टमेंट, शाहरुख खानचा मन्नत यांचा समावेश आहे.
सध्या सोशल मीडियावर शाहरुख खानच्या मन्नत या बंगल्याचे फोटो खूप व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये शाहरूखचा बंगला थोडा वेगळा दिसतो. शाहरुखने सध्या त्याचा संपूर्ण बंगला प्लास्टिकच्या कव्हरने झाकला आहे. असे म्हटले जाते की शाहरुखने कोरोनाव्हायरस पासून वाचण्यासाठी त्याच्या संपूर्ण बंगल्याला प्लास्टिक शिल्ड घातले आहे. पण खरे मात्र असे काहीच नाही. चला तर मग जाणून घेऊ शाहरुख खानने त्याच्या बंगल्याला प्लास्टिकचे कव्हर का घातले.

सोशल मीडियावर सध्या शाहरुख खानचा मन्नत हा बंगला संपूर्ण पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिकने झाकलेला दिसतो. यावर काही सोशल मीडिया युजर्सनी प्रतिक्रिया दिली की कोरोना व्हायरस हवेतून संक्रमित होत असल्यामुळे त्यासाठीच्या सुरक्षेसाठी शाहरुख खानने त्याच्या बंगल्याला प्लॅस्टिकचे कव्हर घातले.
शाहरुख खानने हा बंगला २००१ मध्ये खरेदी केला होता. त्यावेळी शाहरुख खानने हा बंगला १३.३२ करोड रुपयांना खरेदी केला होता. आताच्या काळात या बंगल्याची किंमत २०० करोड रुपयांहून अधिक झाली आहे. हा बंगला मुंबईतील वांद्रे मधील बँड स्टँड येथे आहे.
शाहरुख खानने पावसामुळे बंगल्यावर प्लास्टिक घातल्याचे म्हटले जाते. सध्या मुंबईत पावसाचा हंगाम असल्यामुळे पावसाची सतत रिमझिम चालू असते. शाहरूखचा एका जवळील व्यक्तीने सांगितले की पाऊस सुरू झाल्यामुळे शाहरुखने त्याचा बंगला प्लास्टिकच्या कव्हरने झाकला आहे. आणि हे तो फक्त या वर्षीच नव्हे तर दरवर्षी करतो.
असे म्हटले जाते की शाहरुख खानचा हा बंगला समुद्र किनारी असल्यामुळे येथे हवामानातील ह्युमिडीटीचा खूप त्रास होतो. त्यामुळे येथील प्रत्येक घरावर दर पावसाळ्यात प्लास्टिकचे कव्हर घालावेच लागते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !