Headlines

२७ वर्षापूर्वी प्रदर्शित झालेल्या ‘हम हैं राही प्यार के’ चित्रपटातील हा छोटा मुलगा आज आहे बॉलिवूडमधील मोठा अभिनेता, नाव वाचून थक्क व्हाल !

बॉलीवूड मध्ये अनेक चित्रपट दर महिन्याला प्रदर्शित होत असतात. यातील काही चित्रपट त्यातील गोष्टीमुळे तर काही त्यातील एक्शन आणि ड्रामा मुळे, तर काही त्यात असलेल्या कलाकारांमुळे प्रेक्षकांच्या लक्षात राहतात. या अनेक चित्रपटांमध्ये असेही काही चित्रपट असतात सदाबहार चिरतरुण म्हणून गणले जातात. यातीलच एक चित्रपट म्हणजे हम है राही प्यार के.
हा चित्रपट १९९३ ला प्रदर्शित झाला होता. या २३ जुलैला या चित्रपटाला २७ वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यावेळी हा चित्रपट महेश भट्ट यांनी दिग्दर्शित केला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांची सुद्धा भरपूर पसंती मिळाली. या चित्रपटात जुही चावला आणि आमिर खान यांच्या प्रमुख भूमिका होत्या. तर अभिनेता कुणाल खेमू याने बाल कलाकार म्हणून या चित्रपटात काम केले होते.
त्याच्या सुद्धा कामाची प्रशांसा प्रेक्षकांनी केली होती. या चित्रपटाची आठवण पण म्हणून अभिनेता कुणाल खेमू ने इंस्टाग्राम वर या चित्रपटाशी निगडित काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोमध्ये जुही चावला आणि आमिर खान सोबत बालपणीचा कुणाल खेमू सुद्धा दिसत आहे. या फोटो सोबत कुणाल ने कॅप्शन मध्ये लिहिले कि, मला चित्रपटाच्या प्रदर्शनाचे योग्य तारीख नक्की ठाऊक नाही मात्र माझा गुगलवर विश्वास आहे.
या चित्रपटासाठी अभिनेत्री जुही चावलाला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता. चित्रपटाबद्दल बोलायचे झाल्यास या चित्रपटात आमिर खानने राहुल मन्होत्रा चे पात्र साकारले होते ज्याचे स्वतःची एक गारमेंट कंपनी असते.

या चित्रपटात आमीर खान आणि जुही चावला सोबत कुणाल खेमू, बेबी अशरफा, शारख भरुचा या कलाकारांनी काम केले होते. तर नदीम श्रावण यांनी या चित्रपटातील गाणी संगीतबद्ध केली होती. या चित्रपटाला त्यावर्षी ३९ वा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.
तसेच फिल्मफेअरचे सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट प्लेबॅक सिंगर फीमेल आणि आणि सर्वोत्कृष्ट गीतकार हे पुरस्कार या चित्रपटाला मिळाले होते. तर महेश भट यांना त्यावर्षीचा राष्ट्रीय चित्रपट विशेष ज्युरी पुरस्कार मिळाला.

राहुल त्याच्या स्वर्गवासी बहिणी च्या तीन मुलांना सनी, मुन्नी आणि विक्की यांना सांभाळत असतो. तर जुही चावलाने वैजंतीमाला हे पात्र साकारले असून ती एका दक्षिण भारतीय बिजनेसमैन आणि संगीत प्रेमीची मुलगी असते. आपल्या मुलीने आपल्या जातीतच लग्न करावे अशी तिच्या वडिलांची इच्छा असते. १९९३ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट त्यावेळी बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता.
कुणाल खेमू बद्दल बोलायचे झाल्यास त्याने गोलमाल चित्रपटाच्या सीरिजमध्ये काम केले आहे तसेच तो नवाब कुटुंबाचा जावई म्हणजेच अभिनेत्री सोहा अली खान चा नवरा आहे. कुणालने चित्रपटांत सोबतच अभय यासारख्या वेब सिरीज मध्ये सुद्धा काम केले. त्याचा लूटकेस हा चित्रपट लवकरच ओटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !