Headlines

शत्रुघ्न सिन्हा यांनी काढली करण जोहरच्या शोची इज्जत, म्हणाले आमच्या काळात …

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू नंतर बॉलीवूड मध्ये निर्माण झालेले घराणेशाहीच्या वादाचे वादळ थांबण्याचे नाव अजूनही घेत नाही. या मुद्द्यावरून प्रत्येक जण आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत. इंडस्ट्रीमध्ये एकीकडे काही कलाकारांनी नेपोटिज्मला विरोध केला आहे तर काही कलाकारांनी हे चुकीचे असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे सध्या नेपोटिज्म वरून सोशल मीडियावर आरोप-प्रत्यारोपाचा खेळ सुरू आहे. आता या वादामध्ये बॉलीवूडचे दिग्गज कलाकार शत्रुघ्न सिन्हा यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली आहे.
नुकताच शत्रुघ्न सिन्हा यांनी करण जोहरचा लोकप्रिय शो ‘कॉफी विथ करण’ वर निशाणा साधला. करण जोहर यांनी सांगितले की “आमच्या काळात ना कोणता ‘कॉफी विथ करण होता’ ना ‘कॉफी विथ अर्जुन होता’, ना कोणता अशा प्रकारचा शो होता. शत्रुघ्न यांनी पुढे म्हटले की, या इंडस्ट्रीमध्ये कोणी राहावे आणि कोणी राहू नये हे ठरवणारे आपण कोण ? ”

दिग्दर्शक निर्माता करण जोहर अभिनेता सुशांत सिंह राजपूत ला हिरो मानायचा. सुशांतच्या आ*त्म*ह*त्ये*नंतर करण जोहर चे अनेक व्हिडिओ समोर आले ज्यामध्ये त्याने सुशांत सिंह राजपूत ची मजा उडवली होती. त्यानंतर जो तो करण जोहरला ट्रोल करू लागला. करण जोहर वर इंडस्ट्रीमध्ये नेपोटिज्मला खतपाणी घालण्याचा लागला आहे. अनेक लोकांचे म्हणणे आहे की करण जोहर त्याच्या चित्रपटांमध्ये फक्त स्टार किड्सला संधी देतो.
तर अभिनेत्री कंगना राणावत ने सुद्धा करण जोहर वर निशाणा साधत म्हटले होते एम एस धोनी द अनटोल्ड स्टोरी यासारखा सुपरहिट चित्रपट देऊनही सुशांतच्या ड्राईव या चित्रपटाला कोणताच खरेदीदार मिळाला नाही. यामुळे बॉलिवूडमध्ये अनेक टॅलेंटला संधी देणाऱ्या चित्रपट निर्माता करण जोहरने सुशांत सिंह राजपूतला फ्लॉप ठरवले.
कंगनाचे असे म्हणणे आहे की चित्रपट निर्माता करण जोहरने सुशांत सिंह राजपूत सोबत ड्राईव हा चित्रपट बनवला व नंतर त्याला खाली दाखवण्यासाठी हा चित्रपट कोणी खरेदी करत नाही असे सांगून हा चित्रपट आपण थिएटरमध्ये प्रदर्शित करू शकत नाही असे म्हटले. ड्राईव या चित्रपटाची शूटिंग तीन वर्षे चालू होती.
कंगनाने पुढे करण जोहर नंतर चित्रपट निर्माता आदित्य चोप्रा वर निशाणा साधला ती म्हणाली की सुपर हिट चित्रपट देऊन सुद्धा आदित्य चोप्रा सुशांत सोबत काम करण्यास का नकार देत होते. कंगनाच्या मते यामागे सुद्धा करण जोहरच आहे. आदित्य चोप्रा आणि करण जोहर बालपणापासूनचे एकमेकांचे मित्र आहेत. सुशांत खूप चांगला अभिनेता होता. त्याला इंडस्ट्री मध्ये खूप काम करायचे होते. पण तो आउटसाईडर असल्यामुळे बॉलीवूड चे मोठे प्रोडक्शन हाऊस त्याला दरवेळी किनारा दाखवायचे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !