Headlines

या चित्रपटानंतर दीपिका पदुकोण जाणार सर्वाधिक मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींच्या यादीमध्ये, एका चित्रपटासाठी घेतेय तब्बल एवढे मानधन !

“बाहुबली” प्रभास हा त्याचा आगामी चित्रपटात बॉलीवूड मधील सुप्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोण सोबत दिसणार आहे. या चित्रपटासाठी होकार देताच दीपिका पदुकोण हिंदी चित्रपट सृष्टीतील जास्त मानधन मिळवणारी अभिनेत्री ठरली आहे. प्रभात’च्या या आगामी चित्रपटाबद्दल तीन दिवस आधीच घोषणा झाली आहे. दीपिका पदुकोण ही तिच्या चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकेतील पात्राइतके मानधन स्वीकारते.
परंतु या चित्रपटासाठी प्रभासचे मानधन ५० करोड इतके असणार आहे, दीपिकाला २५ करोड इतके मानधन मिळणार आहे. दीपिका ही हल्लीच्या काळात सर्वात अधिक लोकप्रिय व चित्रपटांसाठी सर्वात जास्त मागणी असणारी अभिनेत्री आहे. तिच्या कोणत्याही चित्रपटाबद्दल कळताच सोशल मीडियावर लगेच चर्चा सुरु होते, ट्रेंड ठरू लागते. सोशल मीडियावर देखील तिच्या काही चाहत्यांनी प्रभास व दीपिकाला चित्रपटामध्ये एकत्र बघण्यास मिळावे, अशा पोस्ट देखील शेयर केल्या होत्या आणि आता खरंच दीपिका पदुकोण व प्रभास आपल्याला एकत्र पडद्यावर दिसणार आहेत.
प्रभास आणि दीपिकाचा आगामी चित्रपटाचे वैजयंती मुव्हीज निर्माते आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अश्विन नाग हे करणार आहेत. सोशल मिडियावर ही बातमी शेयर होताचं चाहत्यांची चर्चा सुरु झाली, ही बातमी एकदम ट्रेंड बनून गेली. साऊथच्या चित्रपट निर्मात्यांनी या चित्रपटाकरिता दीपिकाला २५ करोड मानधन देण्याचे निश्चित केले.

सूत्रांच्या माहितीनुसार, सुरुवातीला दीपिकाने या चित्रपटासाठी नकार दिला होता. तिला यामध्ये काही रुची नव्हती. पण दीपिकाने या चित्रपटात काम कराव अशी साऊथच्या निर्मात्यांची इच्छा होती. भले ही या चित्रपटासाठी दीपिकाचे मानधन प्रभासच्या तुलनेत कमी असेल परंतु २५ करोड मानधनामुळे जास्त मानधन मिळवणारांच्या यादीत गेली आहे.
या चित्रपटामध्ये दीपिकाचे पात्र इतके मजबूत नव्हते. पण निर्माते दीपिकाच्या भूमिकेवर काम करत आहेत, व ते पात्र महत्त्वपूर्ण तयार करू पाहत आहेत. सध्या दोन्ही कलाकार लॉकडाऊन संपताच स्वतःच्या चित्रपटाच्या कामाची वाट पाहत आहेत. लॉकडाऊन नंतरच चित्रपटाचे काम सुरु होणार आहे.
प्रभास व दीपिकाला एकत्र एका पडद्यावर बघण्याचं चाहत्यांचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. या आगामी चित्रपटाची घोषणा होताच दोन्ही कलाकारांनी एकमेकांना सोशल मीडियावर फॉलोव करण्यास सुरुवात केली आहे. दीपिका “83” या चित्रपटामध्ये रणवीर सिंहसोबत दिसणार आहे तरं प्रभास “राधे श्‍याम” या चित्रपटामध्ये दिसेल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !