Headlines

गंगूबाई काठियावाडीसाठी आलिया भट्टने घेतले आहे तब्बल एवढे मानधन, जाणून घ्या !

लॉकडाऊन नंतर आता पुन्हा एकदा सर्व परिस्थिती मार्गावर येऊ पाहत आहे. त्याचप्रमाणे अनेक चित्रपट देखील लागोपाठ प्रदर्शित होतं आहेत आणि प्रेक्षकांचा या सर्वच चित्रपटांना उदंड प्रतिसाद मिळत आहे. हिंदी, मराठी चित्रपट लोक काही निर्बंध असतानाही आवर्जून चित्रपटगृहात जाऊन पाहत आहेत. तसंच अजून एक चित्रपट सध्या नुकताच प्रदर्शित झाला आहे तो म्हणजे गंगूबाई काठियावाडी. संजय लीला भन्साळी निर्मित गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट सध्या चर्चेत आहे.

गंगूबाई काठियावाडीचे चाहते खूप दिवसांपासून वाट पाहत होते पण कोरोना व्हायरसमुळे या चित्रपटाचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले होते. मात्र आज शुक्रवारी हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला आहे. आलिया भट्टने या चित्रपटात गंगूबाईची भूमिका साकारली आहे, परंतु हा चित्रपट करण्यासाठी आलिया भट्टने किती मानधन स्वीकारले तुम्हाला माहिती आहे का?

आलियाशिवाय या चित्रपटात अजय देवगण, हुमा कुरेशी, शंतनू माहेश्वरी, विजय राज यांसारखे दिग्गज कलाकार आहेत. या तगड्या कलाकारांनी या चित्रपटासाठी मोठी रक्कम घेतली आहे. चला तर मग जाणून घेऊया ‘गंगुबाई काठियावाडी’साठी कोणत्या अभिनेत्याने किती फी घेतली आहे. अजय देवगणने चित्रपटासाठी करोडो रुपये चार्ज केले आहेत. अजय देवगण चित्रपटात छोटी भूमिका साकारत आहे. अजय देवगण चित्रपटात रहीम लालाची भूमिका साकारत आहे, ज्यासाठी त्याने ११ कोटी रुपये घेतले आहेत.

ट्रेलरमध्ये आलिया भट्टनंतर कुणी अधिक झळकत चाहत्यांचे लक्ष घेतले आहे तर ते विजय राज ट्रान्सजेंडर रजियाबाईच्या भूमिकेत दिसणारा प्रसिद्ध अभिनेता विजय राज याने या चित्रपटासाठी १.५० कोटी रुपये घेतले आहेत. द क्वीन ऑफ कामाठीपुरा, गंगूबाई काठियावाडी या प्रतिभावान पात्रासाठी आलिया भट्टने २० कोटी रुपये घेतले आहेत. गँग ऑफ वासेपूरमधील प्रसिद्ध अभिनेत्री हुमा कुरेशी देखील चित्रपटांमध्ये दिसत आहे, हुमाने या चित्रपटासाठी २ कोटी रुपये घेतले आहेत.

हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी खूप दिवसांपासून आपण सर्वच वाट पाहत होतो, आता हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे, त्यामुळे चित्रपटाला चाहत्यांनी किती पसंती दिली हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !