Headlines

सासू – सुना एकत्र धरणार ठेका, दोघींचा डान्स होतोय प्रचंड व्हायरल, बघा तरी नक्की काय सुरूय !

गेले काही दिवस वेगवेगळ्या ट्विस्ट मुळे आई कुठे काय करते ही मालिका टिआरपी मध्ये पहिल्य़ा नंबरवर आहे. या मालिकेतील प्रत्येक पात्र हे प्रेक्षकांना खिळवुन ठेवत असते. शिवाय या मालिकेची कथा ही मालिकेतील इतर पात्रांचा विचार करुन तसेच त्यांना मध्यवर्ती ठेवुन बनवली आहे. त्यामुळेच अरुंधती या मुख्यपात्रासोबतच इतर पात्र देखील तितकीच महत्वाची वाटतात.

काही दिवसांपुर्वीच या मालिकेत अभि आणि अनघाचे लग्न पार पाडले. या दोघांचे लग्न होण्या पुर्वी मालिकेत अनेक चढ उतार दाखवण्यात आले आणि अखेरीस हे लग्न पार पाडले. मालिकेतील अनघा आणि अरुंधती ही सासु सुनेची जोडी प्रेक्षकांना खुप भावली. पण मंडळी ही ऑनस्क्रिन जोडी ऑफस्क्रिन सुद्धा तितकीच धमाल आहे.

सध्या सोशल मीडियावर अनघा आणि अरुंधतीचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये दोघीही डान्सची प्रॅक्टीस करताना दिसत आहे. विशेष म्हणजे ही डान्स प्रॅक्टीस त्यांच्या मालिकेसाठी नसुन एप्रिल महिन्यात होणाऱ्या स्टार प्रवाह पुरस्कार सोहळ्यासाठी आहे. या सोहळ्यात अरुंधती आणि अनघा ही सासु सुनेची जोडी एकत्र डान्स सादर करणार आहे.

अरुंधती आणि अनघा सोबत आणखी काही जोड्या देखील सोहळ्यात त्यांचा परफॉर्मन्स सादर करणार आहे. या सोहळ्या संदर्भातील प्रोमोसुद्धा आता चॅनलवर दाखवले जात असल्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !