Headlines

प्रेम विवाह केला तरीही बायकोचे एक्स बॉयफ्रेंड सोबत संबंध, रागवलेल्या नवऱ्याने घडवली जन्माची अद्दल !

काही आठवणी या न पुसता येणाऱ्या असतात असे म्हणतात. त्यात जर त्य़ा आठवणी या प्रेमाच्या असतील तर त्या काही बाबतीत अशक्यच म्हणाव्या लागतील. आणि याची जाणीव जर घरच्यांना झाली तर मग याची काही खैर नसते. पण पाटणा मध्ये एक अजबच प्रकार घडला.

एका महिलेचा तिच्या बॉयफ्रेंडशी प्रेम विवाह झाला. दोघांचा सुखी संसार सुरु असतानाच नवऱ्याच्या मानेवर संशयाचे भुत बसले आणि पुढे संसाराचे होत्याचे नव्हते झाले. 24 फेब्रुवारीला बिहारमधील मुंगेर येथे ही घटना घडली.

तर त्याचे झाले असे की साजन नावाच्या तरुणाला त्याच्या पुत्नीचे रुपेश नावाच्या तरुणा सोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. तोच राग मनाच धरुन त्याने त्याच्या पत्नीच्या प्रियकराचा काटा काढायचा प्लॅन तयार केला. या सर्व प्रकारामध्ये त्याने त्याच्या भावाची मदत घेतली होती.

या दोन भावांनी मिळुन रुपेशला अमझोर डोंगरावर फसवुन बोलावले. त्यानंतर त्यांनी त्याचे हातपाय बांधले आणि त्याचा गळा चिळुन त्याला डोंगरावरुन ढकलुन दिले. त्यानंतर त्यांनी घटनास्थळावरुन पळ काढला.

पण सुदैवाने रुपेश वाचला व डोंगरावरुन त्याच अवस्थेत खाली उतराला. जखमी अवस्थेतील रुपेशला डोंगर पायथ्याशी असलेल्या काही नागरिकांनी पाहिले आणि या बाबत पोलिसांकडे तक्रार केली.

पोलिस आल्यावर रुपेशची चौकशी सुरु झाली. पण आरोपींनी त्याच्या गळ्यावर वार केला असल्यामुळे त्याला धड बोलता येत नव्हते म्हणुन त्याने कागदावर साजन आणि त्याचा भाऊ सागर चे नाव लिहुन दिले. व त्याच्या सोबत त्यांनी जे जे केले या बाबतची माहिती दिली. पोलिसांना सर्व माहिती मिळताच त्यांनी साजन व सागर वा अटक केली.

पोलिसांनी अटक केल्यावर रुपेश हा माझ्या पत्नीचा एक्स बॉयफ्रेंड आहे आणि ती त्याच्याशी रोज बोलायची जे मला नेहमी खटकायचे असे साजनने सांगितले.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !