Headlines

पॅन्ट घालायला विसरली वाटतं मलायका तिच्या ड्रेसिंग सेंन्स मुळे होत आहे ट्रोल !

सिने दिग्दर्शक रितेश सिधवानीने त्याच्या नवविवाहित मित्र फरहान अख्तर आणि शिबानी अख्तरच्या लग्ना साठी एक पार्टी ठेवली होती. गुरुवारी झालेल्या या पार्टीत अनेक बॉलिवुड कलाकार उपस्थित होते. या पार्टीत लाइका अरोड़ा, अर्जुन कपूर, करीना कपूर, करिश्मा कपूर, दीपिका पादुकोण यांसारख्या बड्या कलाकारांनी हजेरी लावली होती. पण सगळ्यांची नजर खिळली ती अभिनेत्री मलाइका अरोडा वर. मलाइकाचा त्यादिवशीचा तो पार्टी लुक सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

मलाइका बॉलिवुडची सर्वात स्टाइलिश दिवा म्हणुन ओळखली जाते. ही गोष्ट तिने पुन्हा एकदा खरी करुन दाखवली. तिचा तो लुक तिच्या चाहत्यांना खुप आवडला आहे. या पार्टीमध्ये तिने ब्लैक कलर चा ट्रांसपेरेंट गाउन घातला होता. तो वन पिस साईड कट होता.

लग्नाची पार्टी ही खरीतर फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर ची होती मात्र तरीही या पार्टीत खरे चारचांद मलाइकाने अरोडाने लावले. कॅमेऱ्यासमोर येताच तिने फोटोग्राफरस ना सुद्धा खुप चांगल्या पोझ दिल्या. या पार्टीत करिना , करिश्मा या सुद्धा ब्लॅक लुक मध्ये आलेल्या. हे झाले फहरान आणि शिबानीच्या पार्टी लुक बद्दल. तिच्याबद्दल होणारी ट्रोलिंग इथेच थांबली नाही.

पुन्हा दुसऱ्या दिवशी सुद्धा तिच्या ड्रेस सेन्सबद्दल ट्रोल करण्यात आले. घरातुन बाहेर निघताना तिने ओवरसाइज व्हाइट शर्ट आणि त्याच्यावर क्रीम कलर चा ओवरसाइज वुलचा पोचू स्टाइल स्वेटर घातला होता. यावर तिने हाय हिल्स बुट्स घातले होते. या कपड्यात व्हायरल झालेले फोटो हे तिचे नो मेकअफ लुक मधले होते. तिने चेहऱ्यावर मास्क लावला होता. आणि केस फोल्ड करुन बांधली होती.

का ट्रोल झाली मलाइका ?
मलाइका हा लुक सुद्धा खुप युनिक होता पण तिने शर्ट सोबत खाली कोणतीही जिन्स किंवा शॉर्टस् घातली नव्हती. काही युजर्सने तर पॅन्ट घालयला विसरलीस का अशी कमेंट सुद्धा केली. तर एकाने म्हटले कि ही काहीतरी घालयला विसरली आहे. तिची स्टाइल अपुर्ण राहिली आहे. तर एकाने अजब लोकांची गजब दुनिया असे म्हटले आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !