Headlines

माझी तुझी रेशीमगाठ सिरीयल मध्ये यशच्या वागण्याचा नेहाला त्रास, शेवटी नेहाने केले असे काही, जाणून घ्या !

झी मराठीवरील मालिका “माझी तुझी रेशीमगाठ” सध्या फारचं रंजक वळणावर आहे. या मालिकेत जेसिका नावाचे नवे पात्र आल्याने यश आणि नेहाच्या कथेमध्ये नवनवे ट्विस्ट येताना दिसत आहेत. समीरच्या युक्तीप्रमाणे जेसिका ही यशची एक्स-गर्लफ्रेंड असल्याचे नेहाला सांगून त्या दोघांना जवळ येतं असलेले पाहून नेहाचा जळफळाट होईल आणि यशवर तिचे असलेले प्रेम ती कबूल करेल.

समीर यशला युक्ती सांगतो आणि नेहाने प्रेम कबूल करावे या आशेने तो ते मान्य देखील करतो. नेहासमोर मुद्दाम या अनेक वेगवेगळ्या घटना घडवून आणल्या जात होत्या, ज्याने तिला त्रास होईल आणि ती यशवरील प्रेम कबूल करेल. आता अखेरीस समीरच्या युक्तीने कमाल केली; नेहाने यशवरील प्रेमाची कबुली दिली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by ❤️माझी तुझी रेशीमगाठ❤️ (@mazi_tuzi__reshimgath_official)


प्रेक्षकांना ज्या भागाची आतुरता होती, शेवटी आता तो भाग लवकरच मालिकेमध्ये दिसणार आहे. नुकताच आलेला मालिकेचा प्रोमो बघून प्रेक्षकांची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली आहे. यश जेसिकाला प्रोपोज करत असताना तिथे नेहा पोहचते आणि हे तिला पटतं नसल्याचे सांगत रडू लागते, यावर यश म्हणतोय तुला का इतका त्रास होतोय आणि तू का एवढी जवळ येते आहेस माझ्या? यावर नेहा त्याला उत्तर देते कारणं माझं प्रेम आहे तुझ्यावर आणि आय लव्ह यू म्हणत त्याला बिलगते.

हा प्रोमो पाहताच हा भाग कधी प्रदर्शित होणार याची आतुरता सर्वांनाचं लागली आहे. पुढे काय घडणार हे पाहणं देखील तितकंच मजेशीर आणि रंजक असणार आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !