Headlines

ना बायको ना मुलं मग कोण असणार सलमान खानच्या २३०० करोड रुपये संपत्तीचा मालक, जाणून घ्या !

बॉलिवुडच्या भाईजानच्या चाहत्यांची संख्या जगभरात करोडोच्या संख्येत आहे. अबाल वृद्धांपुर्यंत त्याची मोहिनी पहायला मिळते. अभिनया व्यतिरिक्त वेगवेगळ्या अभिनेत्रींसोबतच्या अफेअरमुळे तो नेहमीच चर्चेत राहिला. कित्येकदा त्याच्या लग्नाच्या अफवा देखील पसरल्या मात्र त्या काही खऱ्या झाल्या नाही. सलमान आता ५५ वर्षांचा झाला असुन त्याच्या लग्नाचा मुहुर्त अजुनही सापडलेला नाही. त्यामुळे पुढे जाऊन सलमानच्या भल्या मोठ्या संपत्तीचा वारस कोण असा प्रश्न अनेकांच्या मनात घोंगावत आहे.

पण सलमानने स्वता या प्रश्नाचा खुलासा केला आहे. काही दिवसांपुर्वी महानायक अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या करोडो रुपयांच्या संपत्तीचा मालक त्यांचा एकुलता एक मुलगा अभिषेक असेल असे जाहिर केले आहे. त्यांमुळे सलमान जर अविवाहित राहिला तर त्याच्या संपत्तीचा मालक कोण असा प्रश्न उद्भवतो.

सलमानने एकदा सांगितलेले कि जर माझे लग्न झाले तर मी गेल्यावर माझी अर्धी संपत्ती ट्रस्टला दान द्यावी आणि माझे लग्न झाले नाही तर मी गेल्यावर माझी पुर्ण संपत्ती ट्रस्टला दान द्यावी. मिळालेल्या माहितीनुसार सध्या सलमानकडे २३०० करोड रुपयांची संपत्ती आहे. सलमानचे नाव बॉलिवु़डसोबतच जगभरातील महागड्या अभिनेत्यांमध्ये घेतले जाते. त्याच्याकडे स्वताचे प्रायवेट जेट आहे तसेच महागड्या लग्ज़री कार आहेत.

सलमान एका चित्रपटासाठी ५० ते ६० करोड रुपये फि घेतो. गेली ३३ वर्षे तो हिंदी सिनेसृष्टीत कार्यरत आहे. १९८८ मध्ये प्रदर्शित झालेल्या बिबी हो तो ऐसी हो या चित्रपटात त्याने छोटीशी भुमिका केली होती. या चित्रपटात अभिनेत्री रेखा प्रमुख भुमिकेत होती. १९८९ मध्ये ‘मैंने प्यार किया’ या चित्रपटातुन प्रमुख भुमिका त्याने पहिल्यांदाच पडद्यावर साकारली. या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री रेखा प्रमुख भुमिकेत होती. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट चांगलाच गाजला. ३३ वर्षांच्या कारकिर्दीत सलमानने एकाहुन एक सरस असे अनेक चित्रपट दिले.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !