बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटणी तिच्या बोल्ड आणि हॉट फोटोंमुळे नेहमीच चर्चेत असते. पण सध्या तिची टायगर श्रॉफसोबतच्या ब्रेकअपमुळे नाव चर्चेत आहे. आता हे कपल वेगळे झाल्याचे बोलले जात आहे. दोघांनी एकमेकांना 6 वर्षे डेट केले. पण त्यांनी याबाबतचा कधीच खुलासा केला नव्हता.
पण त्यांच्याकडे पाहून ते प्रेमात किती आकंठ बुडाले आहेत हे सहज लक्षात यायचे. ब्रेकअपच्या चर्चांदरम्यान दिशा आणि टायगरने एकमेकांच्या चित्रपटांना शुभेच्छा दिल्या आहेत. दिशा सध्या तिच्या एक व्हिलन रिटर्नस् या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्यासाठी वेगवेगळ्या इव्हेंट आणि कार्यक्रमांना उपस्थिती लावत आहे.
अशाच एका इव्हेंटमध्ये दिशाने खूपच शरीर प्रदर्शनात्मक आणि फिट कपडे घातले होते. पण या कपड्यात दिशा खूपच अनकम्फर्टेबल दिसली. काही वेळेस ती तिचा टॉप नीट करत होती तर काही वेळेस पॅण्ट वर करत होती. दिशा यात देशी लूकमध्ये दिसत असली तरी तिने खूपच डिपनेकवाला कुर्ता घातला होता.त्यामुळे ती उप्स मुमेंटची शिकार झाली.
View this post on Instagram
चित्रपटासोबतच टायगरसोबतच्या ब्रेकअपलाही खूप उधाण आले आहे. दोघांना अनेकदा वेगवेगळ्या कार्यक्रमात, पार्ट्यांमध्ये तर काही वेळेस विमानतळावर एकत्र पाहिले गेले आहे. मिळालेल्या माहितीनुसार खरेतर दोघांचे नाते वर्षाच्या सुरुवातीलाच तुटले होते.
गेले वर्षभर त्यांच्यात खूप भांडणे होत होती. त्यामुळे त्यांनी त्यांचे नाते संपवण्याचा निर्णय घेतला. टायगर आणि दिशाने जरी त्यांच्या ब्रेकअप बद्दल सांगितले नसले तरी टायगरच्या एका मित्राने ही बातमी खरी असल्याचे सांगितले आहे. टायगरच्या मित्राने सांगितले की, त्याला ही हे सर्व अलीकडेच समजले. टायगर त्याच्या मित्रांना याबाबत फारसे काही सांगत नाही.
सध्या तो त्याच्या कामावर लक्ष केंद्रीत करत आहे. नात्याचा किंवा ब्रेकअपचा त्याच्या कामावर कोणताही फरक पडलेला नाही. दिशाचा एक व्हिलन रिटर्नस् तर टायगरचा गणपत आणि बागी 4 हे चित्रपट येणार आहेत.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !