दिशा पाटणी आणि जॉन अब्राहमने नवीन चित्रपटासाठी दिलेत असे बोल्ड सिन पहा, तरीही या सिन बद्दल ती म्हणाली मला काही फरक … !

bollyreport
2 Min Read

श्रद्धा कपूर, सिद्धार्थ मल्होत्रा आणि रितेश देशमुख यांचा गाजलेला चित्रपट एक व्हिलन त्यावेळी प्रेक्षकांच्या खूप पसंतीस उतरला होता. आता या चित्रपटाचा पुढील पार्ट लवकच येणार आहे. एक व्हिलन रिटर्न या चित्रपटाती स्टार कास्ट मात्र बदलेली पाहायला मिळणार आहे. श्रद्धा, सिद्धार्थ आणि रितेश ऐवजी आता दिशा पाटनी, तारा सुतारिया, अर्जुन कपूर आणि जॉन अब्राहम या चित्रपटात दिसणार आहे.

काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाची स्टार कास्ट दिल्ली येथे चित्रपटाच्या प्रमोशन निमित्त गेली होती. या चित्रपटात जॉन आणि दिशाचे काही इंटीमेट सीन्सही पाहायला मिळणार आहे.

दिल्लीतील इव्हेंटमध्ये दिशाला या इंटीमेट सीन्सबद्दल विचारण्यात आले. इंडीया टू डेने दिलेल्या माहितीनुसार या दिशाला एखाद्या मुलीसाठी असे सीन्स करणे कठीण असते का असा प्रश्न विचारला तेव्हा


तिने म्हटले जेव्हा तुम्हाला चित्रपटासाठी इंटिमेट सीन्स करायचे असतात तेव्हा ते कोणासोबत करायचे असतात या गोष्टी जास्त महत्वाच्या असतात. जॉन मला प्रत्येकवेळी मी कम्फर्टेबल आहे की नाही याची काळजी घेत होता. आणि खरेतर मला कोणतीच तक्रार नाही.

 

View this post on Instagram

 

A post shared by Instant Bollywood (@instantbollywood)


नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. या ट्रेलरवरुन तरी चित्रपटाची कथा खूपच गुंतागुंतीची वाटत आहे. कोण खलनायक आणि कोण नायक हे कळत नाही. सस्पेन्सने भरलेल्या या ट्रेलरमध्ये अर्जुन कपूर आणि जॉन अब्राहम यांच्यात जबरदस्त फाईट सिक्वेन्स पाहायला मिळत आहे.

हा चित्रपट २९ जुलैला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट एक व्हिलनचा सिक्वेल जरी असला तरी या चित्रपटाची कथा पहिल्या भागापेक्षा संपूर्ण वेगळी आहे.

https://www.youtube.com/watch?v=Gm2NjRWlFi4

दिशाच्या पुढील कामाबद्दल बोलायचे झाल्यास ती नाग अश्विनच्या आगामी प्रोजेक्ट के या चित्रपटात सुपरस्टार प्रभास, अमिताभ बच्चन आणि दीपिका पादुकोणसोबत दिसणार आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

Share This Article
I'm the founder and editor of bollyreport.Com I love Bollywood entertainment industry. I created this blog to stay updated with bollywood updates.