Headlines

बॉलिवूड इंडस्ट्रीला सर्वात मोठा झटका, या दिग्गज अभिनेत्याचे निधन, पहा !

बॉलिवूडमधील एका मोस्ट वॉन्टेड अभिनेत्याचे निधन झाले आहे. जितेंद्र शास्त्री या भारतातील सिनेजागतातील दिग्गज अभिनेत्याचे निधन झाले आहे. जितेंद्र शास्त्री यांचा चित्रपटात छोटा रोल जरी असला तरी आपल्या अभिनयाने ते याला चार चाँद लावायचे असे म्हणायला काही हरकत नाही. आपल्या अभिनयाने त्यांनी आपली छाप प्रेशकांच्या मनावर छापली आहे.

जितेंद्र शास्त्री यांना बॉलिवूडमध्ये जितू भाई या नावाने ओळखले जायचे. ‘ब्लैक फ्राइडे’ पासून ते अगदी ‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’ या सारख्या कित्येक चित्रपटांमध्ये केलेल्या त्यांच्या अभिनयासाठी त्यांना ओळखले जाते. जितेंद्र शास्त्रीचे निधन झाले आहे अशी बातमी आल्या आल्या संपूर्ण बॉलिवूडला एक चांगला अभिनेता गमवाल्याचे दुःख झाले. जितेंद्र शास्त्री त्यांच्या अभिनयामुळे नेहमीच लोकांच्या लक्षात राहतील.

जितेंद्र शास्त्री यांनी फक्त चित्रपटातच नाही तर थियेटर देखील गाजवले आहे. जितेंद्र शास्त्री यांनी नॅशनल स्कुल ऑफ ड्रामामधून अभिनयाचे धडे घेतले होते. ‘लज्जा’, ‘दौड़’, ‘चरस’, ‘ब्लैक फ्राइडे’, यासारख्या कित्येक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले आहे. २०१९ मध्ये रिलीज झालेला ‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’ या चित्रपटसाठी त्यांचे भरपूर कौतुक केले गेले.

यामध्ये त्यांनी नेपाळमध्ये असलेल्या एका खबरीचे काम केले होते जो आतंकवाद्यांना पकडून देण्यासाठी मदत करत होता. जितेंद्र शास्त्री यांनी प्राईम व्हिडीओची सुपरहिट बेबसिरीज मिर्झापूरमध्ये देखील काम केले होते.


अभिनेता संजय मिश्रा यांनी जितेंद्र शास्त्री सोबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ही पोस्ट करताना संजय मिश्रा यांनी खाली लिहिले आहे, “जीतू भाई आप होते तो आप कुछ ऐसा बोलते, ‘मिश्रा समटाइम क्या होता है ना की, मोबाइल में नाम रह जाता है, और इंसान नेटवर्क से आउट हो जाता है।’ तू या दुनियेत नाही राहिलास पण तू माझ्या मनाच्या आणि आठवणींच्या नेकटवर्कमध्ये नेहमी राहशील असे संजय मिश्रा यांनी लिहिले आहे.

‘CIANTAA’ ने सुद्धा आपल्या ऑफिशिअल ट्विटर अकाउंटवरून जितेंद्र शास्त्रीना श्रद्धांजली दिली आहे. आणि ‘तुमची आठवण येईल जितेंद्र शास्त्री’ असे लिहिले आहे. अवघ्या वयवर्ष ६५ मध्ये जितेंद्र शास्त्रीनी सिनेजगताला गुडबाय केले पण त्यांनी केलेल्या कामामधून त्यांची छाप नक्कीच सोडली आहे.

राजू श्रीवास्तव यांच्या निधनानंतर लगेचच आता जितेंद्र शास्त्री यांचे निधन यामुळे चित्रपट सृष्टीतील दोन चांगले अभिनेते आपण गमावले आहेत. बॉलिवूडमधील अनेक अभिनेते अभिनेत्रीनी यांना श्रद्धांजली देण्यासाठी पोस्ट केल्या आहेत. जितेंद्र शास्त्री मूळचे मध्य प्रदेश मधले होते. आधी थियेटर त्यानंतर चित्रपट असा त्यांनी त्यांच्या अभिनयामधील करिअरच प्रवास केला.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !