Headlines

म्हशीवर जीवापाड प्रेम करत होती मुलगी, एके रात्री प्रेमात अशी गोष्ट केली ती पाहून घरच्यांना बसला धक्का !

प्रेमाला वय नसते, बंधन नसते, भाषा नसते या सर्व गोष्टी आपण लहानपणीपासून ऐकत आलो आहोत. प्रेम हे केवळ प्रियकर-प्रेयसी, नवरा बायको, आईवडील यांच्यावरच असते असे काही नाही. काहीजण त्यांच्याकडे असलेल्या पाळीव प्राण्यांवरही नितांत प्रेम करतात. आणि का करु नये. प्राणी जरी असले तरी ते देखील सजीवच असतात. त्यांना बोलता जरी येत नसले तरी त्यांची सुद्धा माणसांवरील प्रेम व्यक्त करण्याची एक पद्धत असते.

असो… पण प्रेम ही गोष्ट जितकी गोड आहे ना तितकीच ती घातकीसुद्धा आहे. एखाद्यावर अति प्रेम केल्यावर त्यांच्या सोबत थोडासा जरी दुरावा आला तरी तो असह्य होतो. असेच काहीसे उत्तरप्रदेशात घडले. तेथील एक मुलगी कोणा व्यक्तीच्या नाही तर म्हशीच्या प्रेमात वेडी झाली होती. म्हशीचा वापर दूध दे्ण्यासाठी किंवा काही वेळेस शेतीच्या कामात करतात. पण इथे थोडा वेगळाच प्रकार होता. त्या मुलीचे त्या म्हशीसोबत इतके घट्ट नाते होते की तिला तिच्या म्हशीसोबतच विरह सहन झाला नाही त्यामुळे तिने खूप टोकाचे पाऊल उचलले.

उत्तर प्रदेशातील जालौन येथील कुरोना गावांतील एका व्यक्तीकडे तीन म्हशी होत्या. त्या व्यक्तीची मुलगी रजनी त्या म्हशींची देखभाल करायची. ती त्यांना अंघोळ घालायची, रानात चरायला घेऊन जायची. तिचे तिच्या म्हशींवर जिवापेक्षा जास्त प्रेम होते.

असेच 8 जुलैला ती तिच्या म्हशींना चरायला घेऊन गेली असताना अचानक तिच्या सगळ्या म्हशी गायब झाल्या. रजनीने त्यांना शोधायचा खूप प्रयत्न केला. पण त्या तिला सापडल्या नाहीत. म्हशी हरवल्यामुळे रजनीला खूप मोठा धक्का बसला. तिने त्या गोष्टीचा धसका घेतला. आणि ती निराशेच्या आहारी गेली. याचा परिणांम म्हणून तिने खूप मोठे पाऊल उचलले. म्हशींच्या अचानक गायब होण्याच्या दुखा रजनीने स्वताला ग’ळ’फा’स लावून संपवले. जेव्हा घरातल्या व्यक्तींनी तिला फा’सा’ला लटकलेले पाहिले तेव्हा तिला तातडीने दवाखान्यात नेण्यात आले.

आजपर्यंत आपण आई-वडील, प्रेमी, भाऊ बहिणचीच्या विरहाने गळफास घेतल्याचे ऐकले असेल पण या केसमध्ये रजनीने चक्क म्हशीच्या विरहामुळे ग’ळ’फा’स घेतला होता. खरेतरी ही खूप दुखद घटना आहे पण यातून एक शिकायला मिळते. की आपण माणसांवर जितके प्रेम करतो तितकेच प्रेम आपण प्राण्यावर केले तर त्यांच्याकडूनही आपल्याला दुप्पट प्रेम मिळते. त्यांचा आपल्याला लळा लागतो. पण कोणाच्याही विरहामुळे इतके खचून जाणे योग्य नाही. त्यात तर आ’त्म’ह’त्ये’सारखे मोठे पाऊल तर चुकुनही उचलू नये. त्यामुळे आपल्या मागे घरच्यांना खूप त्रास सहन करावा लागतो.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !