Headlines

बॉलिवूड सिनेसृष्टी पुन्हा हादरली, क्रिश चित्रपटात प्रमुख भूमिका केलेल्या या अभिनेत्याचे हार्ट अटॅकने निधन !

टेलिव्हिजन तथा चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते मिथिलेश चर्कवर्तीचे निधन झाले आहे. ३ ऑगस्टच्या संध्याकाळी त्यांची प्राणज्योत मावळली. मिथिलेश यांना ह्रदयाचा आजार होता. काही दिवसांपूर्वीच त्यांना ह्रदयविकाराचा झटका येऊन गेला. त्यानंतर त्यांची तब्येत सतत ढासळत गेल्यामुळे त्यांना लखनऊ येथील हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले.

मिथिलेश यांचे निधन झाल्याची घोषणा त्यांचे जावई आशिष चतुर्वेदींनी केली. त्यांनी फेसबुकवर मिथिलेश यांचा फोटो शेअर करत लिहिले की, तुम्ही जगातले सर्वात उत्तम वडिल होता. तुम्ही मला जावई नाही तर मुलासारखे तुमचे प्रेम दिले , माया दिली. देव तुमच्या आत्म्यास शांती देओ.

मिथिलेश यांच्या निधनाची बातमी समोर येताच संपुर्ण इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. मिथिलेश यांनी त्यांच्या करीअरमध्ये सलमान खान, शाहरुख खान आणि हृतिक रोशनसोबत अनेक मोठ्या आणि सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याशिवाय त्यांनी सनी देओलचा ‘ग’द’र: एक प्रेम कथा’, मनोज बाजपेयी यांचा ‘सत्या’, शाहरुख खानचा ‘अशोका’ तसेच ‘ताल’, अभिषेक बच्चनचा ‘बंटी और बबली’, हृतिक रोशनचा ‘क्रिश’ आणि सलमान खानचा ‘अशोका’ या चित्रपटात काम केले आहे. ‘

मिथिलेश यांनी 1997 मध्ये प्रदर्शित झालेल्या भाई-भाई या चित्रपटातून पदार्पण केले होते. त्यानंतर पुढे यानंतर त्यांनी सत्ता, ताल, फिजा, रोड, कोई मिल गया, गांधी माय फादर आणि बंटी बबली या चित्रपटांमध्ये काम केले. स्कॅम 1992 या वेब सिरीज द्वारे त्यांनी डिजिटल विश्वात पाऊल ठेवले होते. त्यांनी बऱ्याच नाटकांतही कामं केले आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !